घरमुंबईस्नॅक्स सेंटरमध्ये अनैतिक प्रकार उघडकीस; दोघांना अटक

स्नॅक्स सेंटरमध्ये अनैतिक प्रकार उघडकीस; दोघांना अटक

Subscribe

उल्हासनगर येथील चांदीबाई महाविद्यालया शेजारी असलेल्या स्नॅक्स सेंटरमध्ये अनैतिक प्रकार सुरू असल्याचे उघडकीस आले असून याप्रकरणी आरोपींना अटक करण्यात आली आहे.

उल्हासनगर येथे एका १६ वर्षीय विद्यार्थींनीला प्रेमाच्या जाळ्यात ओढत तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याप्रकरणी एका तरुणाला मध्यवर्ती पोलिसांनी अटक केली होती. हे शारीरिक संबंध केबिन बनविलेल्या एका स्नॅक्स सेंटरमध्ये प्रस्थापित झाल्याचे पोलिसांच्या तपासात समोर येताच स्नॅक्स स्टॉल मालकाला पोलिसांनी गजाआड केले आहे. हे स्नॅक्स सेंटर चांदीबाई महाविद्यालयाच्या बाजूला असल्याची माहिती समोर आली आहे.

असा प्रकार आला उघडकीस

एक १६ वर्षीय विद्यार्थींनी चांदीबाई महाविद्यालयात शिकत आहे. तिच्या घरासमोर असलेल्या एका जिन्स कारखान्यात संदेश साबळे (२१) हा तरुण काम करतो. त्याने त्या विद्यार्थींनीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यांची जवळीक वाढल्यानंतर शारीरिक सुख घेण्यासाठी त्यांनी चांदीबाई महाविद्यालयाजवळ असलेले ओम साई राम कोल्ड्रिंक्स आणि स्नॅक्स कॉर्नर गाठले. त्या ठिकाणी महाविद्यालयीन तरुण आणि तरुणीसाठी बंद केबिन बनविली आहे. या केबिनमध्ये एका तासासाठी २०० ते ३०० रुपये घेतले जातात. या शारीरिक संबंधाची माहिती मुलीच्या वडिलांना समजताच त्यांनी मुलीला घेऊन तात्काळ मध्यवर्ती पोलीस ठाणे गाठत पोक्सो कलमांतर्गत संदेश साबळे विरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी संदेशला मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर सुरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक बजरंग झेंडे, पोलीस हवालदार नाना लांडगे, पोलीस शिपाई योगेश कढणे यांनी केलेल्या तपासात ओम साई राम कोल्ड्रिंक्स आणि स्नॅक्समध्ये वेश्याव्यवसाय सुरु असल्याचे उघडकीस आले. या माहितीच्या आधारे स्नॅक्स कॉर्नरचा मालक ललन शाह याला अटक करण्यात आली आहे. ललन शाहचा हा गोरखधंदा गेल्या १० वर्षांपासून चांदीबाई महाविद्यालय परिसरात चालू आहे. अनेक वेळा ललनच्या या बेकायदेशीर धंद्यांवर पोलिसांनी कारवाई केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – उल्हासनगरात महापौर आणि उपमहापौरपदावरून मराठी-सिंधी वाद?


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -