घरमुंबईबघा नेमका कुठे होतोय तुमचा पगार खर्च!

बघा नेमका कुठे होतोय तुमचा पगार खर्च!

Subscribe

मुंबईकरांच्या पगारातील ८ टक्के पगार हा प्रवासावर खर्च होत असल्याचे एमएमआरडीएच्या सर्वेक्षणातून समोर आले आहे.

मुंबई म्हटलं की धावती नगरीही आलीच. या मुंबई महानगर क्षेत्रात राहणारे बरेच नागरिक नोकरी आणि व्यवसायाच्यानिमित्ताने प्रवास करत असतात. मात्र या मुंबईकरांच्या पगारातील ८ टक्के हा पगार फक्त प्रवासावर खर्च होत असल्याचे एमएमआरडीच्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. मुंबईतील नागरिकांना रोजच्या प्रवासाठी महिन्याला किती खर्च करावा लागतो याचा अंदाज घेण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) सुमारे पाच हजार घरांमध्ये सर्वेक्षण केले. त्यावरुन प्रवासावरील खर्चाच्या या टक्केवारीचा अंदाज घेतला आहे.

मुंबईकर अजूनही करतात सायकलने प्रवास

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने २०१७ – २०१८ या दोन वर्षांत मुंबईकरांच्या प्रवासावरील खर्चाचे सर्वेक्षण केले होते. या सर्वेक्षणातून २०४१ पर्यंत नागरिकांची प्रवासाची गरज किती असेल हे जाणून घेण्याचा प्रयत्न त्यात केला गेली. तर मुंबईतील बहुतांश नागरिकांचे प्रवासाचे साधन हे लोकल रेल्वे असल्याचे समोर या सर्वेक्षणातून दिसून आले आहे. याशिवाय बसेस, दुचाकी, रिक्षा, टॅक्सी आणि मेट्रो रेल्वे हे सुद्धा पर्याय लोक प्रवासाठी वापरत असून आता ही बरेच मुंबईकर सायकलचा प्रवासासाठी मोठ्या प्रमाणात वापर करत असल्याचे दिसून आले आहे.

- Advertisement -

प्रवास खर्चात चढउतार

शहरी भागांमधील नागरिक हे नोकऱ्या बदलत असतात. मात्र त्यांचे राहण्याचे ठिकाण कायम असते. त्यामुळे प्रवास खर्चात चढउतार हे सुरुच असतो, असा निष्कर्षही यात निघाला आहे. तसेच पुढील २५ वर्षांत होणाऱ्या पगारवाढीप्रमाणे प्रवासावरील खर्च किती प्रमाणात वाढेल याचाही अंदाज या सर्वेक्षणात घेण्यात आला आहे. तर मासिक उत्पन्नाचा आलेखही या सर्वेक्षणातून स्पष्ट झाला आहे. ३.६ टक्के कुटुंबाचे मासिक उत्पन्न ५ हजार रुपये असल्याचे दिसून आले आहे. तर २८.५ कुटुंबाचे मासिक उत्पन्न १५ हजार ते २० हजार रुपये आहे. तर ३० ते ४० हजार रुपये मासिक उत्पन्न असलेल्या कुटुंबाची टक्केवारी ६.८ टक्के तर ६० हजार आणि त्यापेक्षा जास्त उत्पन्न असलेली कुटुंबे १ टक्का असल्याचे या सर्वेक्षणातून समोर आले आहे.

मासिक पगार आणि प्रवास खर्च

  • मासिक पगार ५ हजार असल्यास प्रवासावर अंदाजे ३८० रुपये खर्च येतो.
  • ३० ते ४० हजार मासिक पगार असल्यास प्रवासाचा खर्च १ हजार ४१४ रुपये इतका येतो.
  • तर ४० ते ६० हजार रुपये मासिक पगार असल्यास १ हजार ९४९ रुपये इतका प्रवास खर्च येतो.
  • ६० हजार ते १ लाख रुपये इतका पगार असल्यास २ हजार ७४ रुपये प्रवास खर्च येत असल्याचे समोर आले आहे.
  • १ लाख रुपयांपेक्षा जास्त पगार असल्यास १ हजार ९५३ रुपये इतका खर्च येतो.

    वाचा – ‘१० वर्षात खासगी हेलिकॉप्टर प्रवासाचा खर्च तब्बल १२१ कोटी’!

    - Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -