घरमुंबई'आणि डॉ. काशिनाथ घाणेकर'साठी मनसे मैदानात

‘आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’साठी मनसे मैदानात

Subscribe

मल्टिप्लेक्समधील मराठी चित्रपटांच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा मनसे आक्रमक झाली आहे. 'आणि डॉ. काशिनाथ घाणेकर' चित्रपटाला प्राइम टाइम न मिळाल्यामुळे मनसेने आक्रमक पवित्रा घेत मल्टिप्लेक्स चालकांना इशारा दिला आहे.

मल्टिप्लेक्समधील मराठी चित्रपटांच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा मनसे आक्रमक झाली आहे. सध्या अभिनेता सुबोध भावे यांचा ‘आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ हा चित्रपट तुफान चालत असला तरीही मल्टिप्लेक्समध्ये त्यांना कमी शो उपलब्ध झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. कल्याणमध्ये या चित्रपटाला प्राइम टाइम न मिळाल्यामुळे मनसेने आक्रमक पवित्रा घेत मल्टिप्लेक्स चालकांना इशारा दिला आहे. कल्याणमधील सिनेमॅक्स चित्रपटगृहात ‘आणि काशिनाथ घाणेकर’चा फक्त एक शो तोही दुपारी तीन वाजता असल्यामुळे प्रेक्षकांचा हिरमोड होत आहे. तर, ‘ठग्ज ऑफ हिंदुस्तान’ ला आठ शो देण्यात आले आहेत.

कल्याणमध्ये प्राइम टाइम नाही 

कल्याणमध्ये बहुसंख्य मराठी भाषिक राहतात. मराठी चित्रपट चांगली कमाई करत असतानादेखील चित्रपटाला प्राइम टाइम न दिल्यामुळे प्रेक्षकांची गैरसोय होत असल्याचा दावा मनसेने केला आहे. त्यामुळे मराठी चित्रपटाला प्राइम टाइम न दिल्यास आंदोलन करण्याचा इशारा मनसेचे शहराध्यक्ष कौस्तुभ देसाई यांनी दिला आहे.

- Advertisement -

मनसेचा खळ्ळ् खट्ट्याकचा नारा 

मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनीही ‘आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ चित्रपटाला स्क्रिन्स न देणाऱ्या मल्टिप्लेक्स धारकांना चांगलेच धारेवर धरले. यासंदर्भात त्यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर मल्टिप्लेक्स चालकांना अंतिम इशारा दिला. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले होते की, सर्व मल्टिप्लेक्स थिएटर मालकांसाठी अंतिम इशारा! “आणि डॉ. काशिनाथ घाणेकर” या चित्रपटावर अन्याय केल्यास “खळ्ळ खटॅक” होणार. या महत्त्वाच्या मराठी चित्रपटाला अन्यायाने डावलून हिंदी चित्रपटांना प्राधान्य दिल्यास ते सहन केले जाणार नाही. येत्या चोवीस तासात “आणि डॉ. काशिनाथ घाणेकर”ला स्क्रीन्स आणि शोज द्या, अन्यथा आम्हाला मनसे स्टाईलने धडा शिकवावा लागेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -