डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘केम छो मिस्टर प्रेसिंडेंट’ कार्यक्रमाला मनसेचा विरोध

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अहमदाबाद दौऱ्याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी प्रश्न उपस्थित केला आहे.

mns amey khopkar kem chho mr president us president donald trump modi ahmedaba
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘केम छो मिस्टर प्रेसिंडेंट’ कार्यक्रमाला मनसेचा विरोध

लवकरच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारत दौऱ्यावर येणार आहेत. २४ फेब्रुवारीपासून ट्रम्प हे दोन दिवसीय दौऱ्यावर येणार असून ते दिल्ली आणि अहमदाबादला भेट देणार असल्याचे जाहीर करण्यात आलं आहे. त्यामुळे अहमदाबादमध्ये सध्या जोरदार तयारी सुरू आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या या कार्यक्रमाला ‘केम छो मिस्टर प्रेसिंडेंट’ असं नावं देण्यात आल्याचं समोर आलं आहे. मात्र मनसेने या कार्यक्रमाला विरोध करत या कार्यक्रमाचं नावं ‘केम छो?’ का असं प्रश्न विचारला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी ट्विट करत असं लिहिलं की, ‘अमेरिकन राष्ट्राध्यक्ष २४ फेब्रुवारीला अहमदाबादला भेट देणार आहेत. पुन्हा अहमदाबाद! आणि, त्या कार्यक्रमाचं म्हणे नाव असणार आहे (संदर्भ: इंडियन एक्सप्रेस) “केम छो मिस्टर प्रेसिडेंट?”.. “केम छो?”.. “केम छो” का?’

मोदी आणि ट्रम्प यांच्यात दूरध्वनीवरून झालेल्या संभाषणानंतर ट्रम्प यांच्या भारत दौऱ्याची घोषणा करण्यात आली. त्यानंतर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने ट्रम्प नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरून भारतभेटीवर येत असल्याचे म्हटले. या दौऱ्यामुळे द्विपक्षीय संबंध आणखी दृढ होतील असा विश्वास भारत आणि अमेरिकेने व्यक्त केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सप्टेंबर २०१९ मध्ये अमेरिका दौऱ्यात ह्युस्टन येथे हाऊडी मोदी कार्यक्रम पार पडला होता. याच पार्श्वभूमीवर आता ‘केम छो मिस्टर प्रेसिडेंट’ असं या कार्यक्रमाला नावं देण्यात आलं आहे. या दौऱ्यात ट्रम्प हे दिल्ली आणि अहमदाबादला भेट देणार आहेत. यावेळेस ट्रम्प विविध क्षेत्रातील व्यक्तींशी संवाद साधणार आहे. तसंच ट्रम्प यांच्यासोबत त्यांची पत्नी मेलेनिया याही भारत दौऱ्यावर येणार असल्याचं परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे.


हेही वाचा – विजेच्या जनजागृतीसाठी राज्यात लवकरच ऊर्जा पे चर्चा