Monday, January 11, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी मराठीसाठी मनसेचा खळखट्याक; मुंबईतील Amazonची कार्यालये फोडली

मराठीसाठी मनसेचा खळखट्याक; मुंबईतील Amazonची कार्यालये फोडली

मराठीच्या मुद्द्यावरुन मनसेने आक्रमक भूमिका घेत पुण्यानंतर मुंबईतील Amazonची कार्यालये फोडली आहेत.

Related Story

- Advertisement -

‘नो मराठी नो Amazon’ या मनसेच्या मोहीमेअंतर्गत अनेक ठिकाणी मनसे कार्यकर्त्यांनी अमेझॉनची पोस्टर्स फाडली होती. त्यानंतर पुन्हा एकदा मराठीच्या मुद्द्यावरुन मनसेने आक्रमक भूमिका घेत पुण्यानंतर मुंबईतील Amazonची कार्यालये फोडली आहेत. मनसे कार्यकर्त्यांनी चांदिवली येथील Amazonच्या दोन कार्यालयात घुसून तोडफोड करण्यात आली आहे. ‘मराठी नाय तर Amazon नाय’, अशी घोषणाबाजी करण्यात आली आहे.

- Advertisement -

 

राज ठाकरेंना पाठवली नोटीस

‘नो मराठी नो Amazon’ हा वाद आता न्यायालयात पोहोचला आहे. याच प्रकरणात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांना तसेच मनसे सचिवांना दिंडोशी सत्र न्यायालाने कोर्टात हजर राहण्यासाठी नोटीस पाठवली आहे. आता मनसे या प्रकरणात काय पाऊल उचलणार हे महत्वाचे असणार आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे या नोटीशीला कसे उत्तर देणार आणि येत्या दिवसातील सुनावणीसाठी उपस्थित राहणार का? असाही सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

असा आहे मनसेचा वाद

- Advertisement -

Amazonवर मराठी भाषा असावी, अशी मनसेची मागणी आहे. मात्र,Amazonने या मागणीसाठी पुर्णपणे नकार दिला आहे. आता या पोस्टर प्रकरणात संपुर्ण वाद हा न्यायालयीन लढाईत पोहचला आहे. मनसेचे पदाधिकारी अखिल चित्रे हे न्यायालयात Amazonवर विरोधात लढत आहेत. मनसे कार्यकर्त्यांकडून याआधी दिंडोशी, सांताक्रुझ (विमानतळ), विलेपार्ले हायवे याठिकाणी असलेल्या फलकांना काळे फासले होते. मनसेच्या कार्यकर्त्यांकडून ठिकठिकाणी लावण्यात आलेले पोस्टर्सही फाडण्यात आले होते. Amazonवर मराठी भाषा वापरण्यासाठी Amazonकडून याआधीच स्पष्टपणे नकार देण्यात आला आहे. मात्र, मनसेनेही हा विषय चांगलाच लावून धरला आहे.


हेही वाचा – ट्रॅफिक जॅम सोडवण्यासाठी पालकमंत्री भुजबळ उतरले रस्त्यावर


 

- Advertisement -