घरताज्या घडामोडीमनसेच्या फेसबुक पेजवर झेंडा बदलला! राहिलं फक्त इंजिन!

मनसेच्या फेसबुक पेजवर झेंडा बदलला! राहिलं फक्त इंजिन!

Subscribe

मनसेच्या फेसबुक पेजवरचा त्यांचा झेंडा २३ जानेवारीआधीच म्हणजे आजच बदलल्याचं पाहायला मिळत आहे. या झेंड्यातून तिनही रंग गायब झाले असून फक्त इंजित तेवढं शिल्लक राहिलं आहे. त्यामुळे आता मनसेचा झेंडा नक्की कसा असेल, याची उत्सुकता अधिक वाढली आहे.

येत्या २३ जानेवारी रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आपल्या पक्षाची नवी दिशा आणि भूमिका ठरणार आहेत. तसेच यावेळी मनसेच्या झेंड्याचा रंग बदलणार असल्याचं देखील समजतंय. त्याच दिशेने आता हालचालींना सुरुवात झाल्याचं दिसत आहे. सोमवारी मनसेच्या अधिकृत फेसबुक पेजवरून मनसेचा झेंडा हटवून फक्त मनसेचं इंजिन ठेवण्यात आलं आहे. त्यामुळे येत्या २३ तारखेला मनसे अध्यक्ष राज ठाकरे आपला भगवा झेंडा घेऊन येणार याची सगळ्यांनाच उत्सुकता लागलेली आहे. गोरेगाव नेस्को येथे मनसेचं पहिलं अधिवेशन पार पडत असून, सकाळी नऊ वाजता या अधिवेशनाला सुरूवात होईल. राज ठाकरे सकाळी नऊ वाजता गोरेगाव येथे अधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत.

मनसेच्या अधिवेशनात पक्षप्रवेश

दरम्यान, मनसेच्या महाअधिवेशनात काहींचा राज ठाकरेंच्या उपस्थितीत अधिकृतपणे मनसेमध्ये पक्षप्रवेश होईल, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. मात्र, मनसेमध्ये कोण प्रवेश करणार याबद्दल माहिती कळू शकलेली नाही. दरम्यान मनसे नेते संदीप देशपांडे यांनी देखील ‘ज्यांना लाचारीचा तिटकारा आहे आणि महाराष्ट्र धर्माचा अभिमान आहे त्यांनी राज साहेबांचे नेतृत्व स्वीकारायला हवे’, असे ट्विट केले आहे. दरम्यान, या अधिवेशनासाठी मनसेचे कार्यकर्ते जय्यत तयारी करत असून प्रत्येक विभाग अध्यक्ष आपापल्या विभागात कार्यकर्त्यांच्या बैठका घेत आहेत. तसेच मुंबईत अनेक ठिकाणी अधिवेशनाचे फलक लावले जात आहेत.

- Advertisement -

mns adhikrut facebook page 1

https://www.facebook.com/mnsadhikrutpage/

- Advertisement -

दरम्यान, यावेळी सर्वात जास्त उत्सुकता आहे ती म्हणजे राज ठाकरे पक्षासाठी कोणती नवी भूमिका जाहीर करणार आहेत त्याची. मनसे भाजपसोबत युती करण्याची दाट शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे. तसेच, मनसेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी राज ठाकरे जो निर्णय घेतील तो मान्य असल्याचीच प्रतिक्रिया देत असल्यामुळे भविष्यात भाजप-मनसे युती झाल्याचं देखील पाहायला मिळू शकतं.

मुंबईत सोमवारी झालेल्या राज ठाकरे यांच्या बैठकीनंतर, शिवसेनेचे औरंगाबादचे माजी जिल्हाध्यक्ष सुहास दशरथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत दाखल होत आहेत, अशी माहिती दशरथे यांनी दिली आहे. शिवसेनेत अन्याय होत असल्याने त्यांनी मनसेत जाण्याचा निर्णय घेतला आहे, असे त्यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -