घरमुंबईवाघीण मारली तिथून जवळच अंबानींचा प्रकल्प - राज ठाकरे

वाघीण मारली तिथून जवळच अंबानींचा प्रकल्प – राज ठाकरे

Subscribe

यवतमाळच्या जंगलात अवनी वाघिणीला मारण्याच्या घटनेवर गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या वादामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुधीर मुनगंटीवार आणि भाजप सरकार यांच्यावर टोकदार टीका केली आहे. या प्रकरणावरून त्यांनी थेट राज्यातलं देवेंद्र फडणवीस सरकार आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर निशाणा साधला आहे.

यवतमाळच्या जंगलात अवनी वाघिणीला मारण्याच्या घटनेवर गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या वादामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुधीर मुनगंटीवार आणि भाजप सरकार यांच्यावर टोकदार टीका केली आहे. या प्रकरणावरून त्यांनी थेट राज्यातलं देवेंद्र फडणवीस सरकार आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर निशाणा साधला आहे. तसेच, ज्या ठिकाणी वाघीण मारली गेली, तिथून ६० किलोमीटरवर अनिल अंबानींचा प्रकल्प येत आहे, त्यासाठीत हा सगळा प्रकार सुरू आहे, असा धक्कादायक गौप्यस्फोटही त्यांनी यावेळी केला. ‘या धेंडांसाठी तुम्ही देश विकायला काढला आहे का?’ अशा शब्दांत राज ठाकरेंनी भाजप सरकारवर खरपूस टीका केली.

वाघीण प्रकरणावरून मुनगंटीवार-मनेका गांधी वाद

काही दिवसांपूर्वी यवतमाळच्या जंगलात टी-1 अर्थात अवनी वाघिणीला गोळी घालून ठार करण्यात आले होते. या वाघिणीने आसपासच्या गावातल्या १३ जणांना ठार केले होते. त्यामुळे आसपासची गावं दहशतीच्या छायेखाली वावरत होती. शेवटी २ वर्षांच्या प्रयत्नांनंतर या वाघिणीला शोधण्याच वनविभागाला यश आलं. मात्र, तिला बेशुद्ध करण्यासाठी ट्रँक्वेलायझर डार्ट देऊनही ती बेशुद्ध झाली नाही, म्हणून तिला गोळी घालण्याशिवाय पर्याय नव्हता असं स्पष्टीकरण वनविभागाकडून करण्यात आलं आहे. या मुद्द्यावरून केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्री मनेका गांधी आणि सुधीर मुनगंटीवार यांच्यात वाद सुरु झाला आहे.

- Advertisement -

‘वनमंत्री आहेत म्हणून वनातलं कळतं असं नाही’

राज ठाकरेंनी सुधीर मुनगंटीवार यांनी ज्या पद्धतीने मनेका गांधी यांना प्रत्युत्तर दिलं, त्यावरून टीका केली आहे. ‘मुनगंटीवारांना मनेका गांधींना इतकं बोलायची आवश्यकता नव्हती. ते वनमंत्री आहेत, याचा अर्थ त्यांना वनातलं सगळं कळतं असं नाही. त्यांनी जबाबदारीनं बोलावं. वाघिणीला बेशुद्ध करणं शक्य होतं, ते करायला हवं होतं. तुम्ही एका वाघिणीला मारलंत, पण त्यामुळे आता त्या वाघिणीची दोन पिल्लंही जिवे जातील’, असं राज ठाकरे म्हणाले. याशिवाय, ‘या लोकांना सत्तेचा माज आलाय’, असं देखील राज ठाकरे यावेळी म्हणाले.


तुम्ही हे वाचलंत का? – ‘म्हणून गोळी झाडली’, अवनी वाघीण प्रकरणाची तिसरी बाजू!

- Advertisement -

‘भाजपला सत्तेचा माज’

दरम्यान, भाजपला सत्तेचा माज आला आहे अशा शब्दांत राज ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधला. ‘यांना वाटतं आपल्याला वाटेल ते आपण करू शकतो. पण मुनगंटीवार काय आज मंत्री आहेत, उद्या नसतील. घोडा आणि मैदान जवळच आहे’, असं राज ठाकरे म्हणाले. त्यामुळे येत्या निवडणुकांमध्ये अवनी वाघिणीचं भूत राज्यातल्या राजकारणावर फिरताना दिसण्याची शक्यता आहे.

‘पुतळे उभारून वाघ वाढत नसतात’

राज्य सरकारने नुकतेच वाघाच्या पुतळ्याचं अनावरण करून बिग बी अमिताभ बच्चन यांना व्याघ्र प्रकल्पाचे ब्रॅण्ड अॅम्बेसिडर म्हणून जाहीर केले आहे. मात्र, ‘वाघाचे पुतळे उभे करून वाघ वाढत नसतात. गुजरातमध्ये हीच गोष्ट सिंहांच्या बाबतीत झाली असती, तर हंगामा झाला असता. यांना फक्त पुतळे उभे करायच आहेत. तिथे पटेलांचा पुतळा उभा केला, इथे वाघांचा पुतळा उभा करायचा’, असेही राज ठाकरे यावेळी म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -