राज ठाकरेंनी व्यंगचित्रातून मुख्यमंत्र्यांना ‘धुतले’

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आपल्या व्यंगचित्रातून थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.

Mumbai
सौजन्य- फेसबुक

आज नरकचतुर्दशी म्हणजे दिवाळीची पहिली आंघोळ अर्थात अभ्यंगस्नान. याच अभ्यंगस्नानचं अवचित्य साधत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक खास व्यंगचित्र साकारलं आहे. या व्यंगचित्रातून त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ‘धुतले’ आहे. राज ठाकरे ६ ते ९ नोव्हेंबर याकाळात आपल्या व्यंगचित्रांमधून अशाचप्रकारे सत्ताधाऱ्यांचा खरपूस समाचार घेणार असलयाचं समजतंय. सोमवारी (काल) धनोत्रयदशीच्या दिवशीच राज ठाकरे यांनी याची नांदी केली होती. त्यापाठोपाठ आजच्या या दुसऱ्या व्यंगचित्रातून राज यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. सध्या सोशल मीडियावर हे व्यंगचित्र तूफान व्हायरल होत आहे. राज समर्थक सोशल मीडियाच्या माध्यमातून या चित्राला पसंती दर्शवत आहेत.

काय आहे या व्यंगचित्रात…

या व्यंगचित्रामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अभ्यंगस्नानाला बसले आहेत. मात्र, त्याचवेळी त्यांचा एक कर्मचारी त्यांच्या कानात येऊन विचारतो आहे, ‘साहेब अख्खा महाराष्ट्र तुम्हाला धुवायला निघाला आहे पाठवू का?’ चित्रातील या प्रसंगाच्या माध्यमातून अगदी मोजक्या पण मार्मिक शब्दांमध्ये राज यांना मुख्यमंत्र्यांना कोपरखळी मारली आहे. याव्यतिरीक्त राज ठाकरेंनी आणखी एक व्यंगचित्र साकारलं आहे. ज्यामध्ये त्यांनी भाजपचे नेते अमित शहा यांना लक्ष केले आहे. अभ्यंगस्नानाच्यावेळी कारंट हे फळ पायाने फोडलं जातं. नरकासूराच्या वधाप्रमाणे हे फळ फोडून वाईट शक्तींचा नाश करायचा असतो अशी धारणा आहे. राज ठाकरेंनी व्यंगचित्रात या फळाच्या जागी अमित शहांचा चेहरा दाखवसा आहे. ‘भाजपला पडलेलं दिवाळी पहाटेचं स्वप्न’ अशा शब्दांत त्यांनी मार्मिक टीकाही केली आहे.


वाचा: भारत देश ‘ICU’मध्ये; राज ठाकरेंची व्यंगात्मक टीका

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here