घरमुंबईबायका बांगड्या भरतील या धास्तीने राम कदम यांची दहीहंडी रद्द; मनसेची पोस्टरबाजी

बायका बांगड्या भरतील या धास्तीने राम कदम यांची दहीहंडी रद्द; मनसेची पोस्टरबाजी

Subscribe

राज्यात आलेल्या पूरपरिस्थितीमुळे भाजपने घेतलेल्या निर्णयाला समर्थन देत राम कदम यांनी हा उत्सव साजरा न करण्याचे यावेळी ठरवले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मात्र राम मदम यांनी खिल्ली उडवली आहे.

भाजप आमदार राम कदम यांनी यंदाची दहीहंडी रद्द केली आहे. राज्यात आलेल्या पूरपरिस्थितीमुळे भाजपने घेतलेल्या निर्णयाला समर्थन देत राम कदम यांनी हा उत्सव साजरा न करण्याचे यावेळी ठरवले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मात्र राम कदम यांनी खिल्ली उडवली आहे. गेल्या वर्षीच्या दहीहंडी उत्सवात राम कदम यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यानंतर नेटीजन्ससह विरोधकांनीही त्यांना चांगलेच धारेवर धरले होते. त्याच पार्श्वभूमीवर मनसेने टीका करत राम कदम यांनी घाबरून यंदाची दहीहंडी रद्द केल्याचे म्हटले आहे. याबाबतचे एक पोस्टर त्यांनी बनवले असून मनसेचे विभाग अध्यक्ष गणेश चुक्कल यांनी यांच्या नावाचे हे पोस्टर आहे. त्यामुळे लबाड लांडग ढोंग करतंय, पूरग्रस्तांच्या नावाने सोंग करतंय, अशी मिश्किल टीकाच या माध्यमातून केल्याचे दिसून येत आहे.

२००९ साली संपूर्ण महाराष्ट्रात स्वाइन फ्लूची साथ पसरलेली असताना व त्यात शेकडो नागरिक मृत्युमुखी पडलेले असताना सरकारने तसेच सर्व राजकीय पक्षांनी दहीहंडीचे कार्यक्रम रद्द करण्याचे आवाहन केले होते. त्यावेळी मुंबई तसेच ठाण्यातील सर्व मोठ्या पारंपारिक दहीहंडीचे कार्यक्रम विशेषत: वरळी येथील सचिन अहिर, पार्ला येथील कृष्णा हेगडे, ठाणे येथील जितेंद्र आव्हाड, प्रताप सरनाईक आदींसह सर्व दहीहंडी आयोजकांनी आपली अनेक वर्ष चालत आलेली दहीहंडी रद्द करून सामाजिक भान दाखवून दिले होते. परंतू त्याच वेळेला प्रथमच दहीहंडी लावणाऱ्या घाटकोपरच्या ‘चमकेश’ ने दहीहंडी रद्द करण्यास नकार देऊन लोकांच्या जीवाची पर्वा न करता आपली राजकीय पोळी भाजून घेतली होती. २०१५-१६ साली पडलेल्या दुष्काळात महाराष्ट्र होरपळत असताना तसेच मुंबईमध्ये पाणी कपात जाहीर असतानाही पाण्याचे टँकर आणून फुल पाण्याची दहीहंडी या ‘चमकेश’ ने घाटकोपर मध्ये साजरी करून आपली हौस भागवून घेतली होती. अशा चमकेशने पश्चिम महाराष्ट्रातील सांगली आणि कोल्हापूर येथील पुरांचे कारण देऊन दहीहंडी रद्द करणे हे खरे कारण नसून या “चमकेश”चे दुखणे हे वेगळेच आहे.

- Advertisement -

गेल्या दहीहंडीच्या वेळेला ‘मुली पळून आणू’ अशी मुक्ताफळे उधळून कुप्रसिद्ध झाल्यामुळे या ‘चमकेश’ च्या दहीहंडी वर मुंबईतल्या गोविंदा पथकांनी बहिष्कार घातलेला आहे. ‘चमकेश’च्या दहीहंडीला कोणतेही पथक सलामी द्यायला फिरकणार नाही. तसेच मुली पळवुन आणू’ या वाक्याने चिडलेल्या महिला प्रचंड निदर्शने करतील आणि दहीहंडीत राडा होऊन जाईल म्हणूनच ‘चमकेश’ घाबरला आहे. गेल्या वेळच्या धसक्याने कोणताही सेलिब्रिटी व मुख्यमंत्र्यांसह कोणताही नेता दहीहंडीला येणार नाही याची खात्री “चमकेश”ला पटली आहे. एवढेच नव्हे तर ‘चमकेश’ च्या अनेक कारनाम्याने नाराज मिडीया त्याची चांगलीच वाजवणार याची त्याला माहिती होती आणि म्हणूनच “चमकेश”ने दहिहंडी रद्द केली. म्हणतात ना की हत्तीचे खायचे दात वेगळे व दाखवायचे दात वेगळे….#गोWINदा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -