घरमुंबईकल्याण लोकसभेसाठी उत्तरभारतीय समाजाला हवी मनसेची उमेदवारी

कल्याण लोकसभेसाठी उत्तरभारतीय समाजाला हवी मनसेची उमेदवारी

Subscribe

आगामी लोकसकभा निवडणुकीसाठी मनसेचा उमेदवार हा कल्याण मतदार संघात उभा करावा, आशी मागणी उत्तर भारतीय सामाजाने मनसे अध्यक्ष राज ठाकरें यांच्याकडे केली आहे.

लोकसभा निवडणूक लढवणार की नाही, याबाबत मनसेची अधिकृत भूमिका अजूनही जाहीर झालेली नाही. मात्र कल्याण लोकसभा मतदार संघात मनसेकडून उत्तरभारतीय समाजाला उमेदवारी मिळावी यासाठी उत्तरभारतीय महापंचायतीचे अध्यक्ष विनय दुबे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे साकंड घातलं आहे. मात्र मनसेकडून अजून कोणताच निर्णय कळविण्यात आलेला नाही. कल्याण लोकसभा मतदार संघात उत्तरभारतीय समाजाची मते मोठया प्रमाणात आहेत. त्यामुळे मनसेकडून उमेदवारी न मिळाल्यास अपक्ष निवडणूक लढवणार असल्याचे दुबे यांनी आपल महानगरशी बोलताना सांगितले.

मनसेची भूमिका अस्पष्ट

कल्याण लोकसभा मतदार संघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. शिवसेनेकडून खासदार डॉ श्रीकांत शिंदे तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून ठाण्याचे नगरसेवक बाबाजी पाटील या दोन उमेदवारांची नावे फायनल झाली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस व मनसे युती होणार असल्याची जोरदार चर्चा अनेक दिवसांपासून सुरू होती. मात्र गुरुवारी राष्ट्रवादीचा उमेदवार जाहिर झाल्यानंतर या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. मनसे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का? असाच प्रश्न आता उपस्थित होत आहे. मात्र मनसेची भूमिका अजूनही जाहिर झालेली नाही. मात्र कल्याण लोकसभा मतदार संघात उत्तरभारतीय समाजाला उमेदवारी मिळावी अशी मागणी उत्तर भारतीय महापंचायतीचे अध्यक्ष दुबे यांनी राज ठाकरे यांच्याकडे केली आहे. मुंब्रा, कळवा ते उल्हासनगरपर्यंतच्या सहा विधानसभा मतदार संघात कल्याण लोकसभेचे क्षेत्र आहे. २०१९ च्या लोकसभा मतदार संघात २५ लाख मतदार आहेत, त्यात १३ लाखाच्या आसपास उत्तरभारतीय समाजाची मते आहेत. त्यामुळे उत्तरभारतीय समाजाला उमेदवारी मिळावी अशी मागणी ठाकरे यांच्याकडे केल्याचे दुबे यांनी सांगितलं. मराठी आणि हिंदी भाषिकांमध्ये झालेला वाद मिटविण्यासाठी दुबे यांनी राज ठाकरे यांना उत्तरभारतीय समाजाच्या मंचावर बोलावून दोन्ही भाषिकांमधील दरी मिटविण्याचा प्रयत्न महापंचायतने केल्याचेही दुबे यांनी सांगितले. त्यामुळे उत्तरभारतीयांच्या मागणीवर राज ठाकरे काय निर्णय घेतात याकडं लक्ष वेधलय.

- Advertisement -

६० टक्के उत्तर भारतीय

कल्याण लोकसभा मतदार संघात ६० टक्के उत्तरभारतीय समाजाची मते आहेत. आतापर्यंत उत्तरभारतीय समाजाचा उमेदवार देण्यात आलेला नाही. त्यामुळे कल्याणातून उत्तरभारतीय समाजाला मनसेकडून उमेदवारी मिळावी, यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिलं आहे. याबाबत चर्चा करून निर्णय कळविण्यात येईल असे मनसेकडून सांगण्यात आले आहे. उत्तरभारतीय महापंचायतीचे सुमारे ४० हजार सक्रीय कार्यकर्ते असून, कल्याण लोकसभा मतदार संघात सुमारे अडीच हजार कार्यकर्ते आहेत. कल्याण लोकसभा मतदार संघात महापंचाय समितीचे सुमारे अडीच हजार कार्यकर्ते आहेत. मनसेकडून उमेदवारी न मिळाल्यास अपक्ष निवडणूक लढविली जाणार असल्याचे उत्तरभारतीय महापंचायत अध्यक्ष विनय दुबे यांनी सांगीतले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -