लोकसभेच्या निकालावर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

mumbai
Raj Thackeray
मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे

लोकसभा निवडणुकीचा निकाल पुन्हा एकदा भाजपच्या दिशेने लागताना दिसत असून यावर विरोधकांच्या मात्र निराशाजनक प्रतिक्रिाया येत आहेत. आपला एकही उमेदवार लोकसभेला उभा केला नसतानाही राज्यभर मोदीविरोधी सभांचा धडाका लावलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभेच्या निकालावर त्यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर अनाकलनीय असे म्हणत, हे आकडे आकलनाच्या पलिकडले असल्याचे त्यांनी म्हटले आहे. अखेर विविध जिल्ह्यात मोदीविरोधी सभा घेऊनही राज्यासह देशातील मोदी लाट तसूभरही कमी झाली नसून उलट ती वाढली असल्याने राज ठाकरे यांनी नक्कीच घोर निराशा झाली असल्याचे त्यांच्या या प्रतिक्रियेतून पाहायला मिळत आहे.