घरमुंबईकाँग्रेसच्या प्रचारासाठी मनसे मैदानात उतरली

काँग्रेसच्या प्रचारासाठी मनसे मैदानात उतरली

Subscribe

दक्षिण मध्य मुंबईचे काँग्रेसचे उमेदवार एकनाथ गायकवाड यांनी दादरच्या शिवाजी पार्क येथे प्रचारासाठी प्रभात फेरी केली. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडेदेखील उपस्थित होते.

लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली असून खासदारकीच्या रिंगणात उतरलेले उमेदवार आता मतदारसंघात फेरफटका मारू लागले आहेत. आज, शनिवारी दक्षिण मध्य मुंबईचे काँग्रेसचे उमेदवार एकनाथ गायकवाड यांनी दादरच्या शिवाजी पार्क येथे प्रचारासाठी प्रभात फेरी केली. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडेदेखील उपस्थित होते. सेना-भाजप सरकारला किंबहुना मोदी सरकारला पराभूत करण्यासाठी आपण काँग्रेसला प्रचारात मदत करत असल्याचे यावेळी देशपांडे यांनी म्हटले आहे. राज्यात एकला चलो रे ही भूमिका घेतलेल्या मनसे पक्षाने आपली भूमिका मवाळ करत आता आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार करण्यास सुरुवात केली आहे. मध्यतंरी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या भेटीगाठीमुळे त्यांच्या एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र मनसे केवळ राष्ट्रवादीच नव्हे तर काँग्रेसलादेखील पाठिंबा दर्शवत असल्याचे आजच्या प्रभात फेरीतून पाहायला मिळाले.

- Advertisement -

कोण आहेत एकनाथ गायकवाड 

काँग्रेसचे माजी खासदार एकनाथ गायकवाड यांना २०१४ मध्ये मोदी लाटेत शिवसेनेचे राहुल शेवाळेंनी पराभव केला. शेवाळे हे थेट मुंबई महानगरपालिकेतून संसदेत गेले. पण तरी जवळपास अडीच लाख मतं घेऊन एकनाथ गायकवाडांनी कडवी टक्कर दिली होती. त्यामुळेच यंदा २०१९ ला मोदी लाट नसताना फक्त मराठी मतांच्या जोरावर हा मतदारसंघ राखणं शेवाळेंसमोर मोठं आव्हान असणार आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत राहुल शेवाळे यांना ३ लाख ८१ हजार तर एकनाथ गायकवाड यांना २ लाख ४२ हजार मतं मिळाली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -