घरमुंबईमनसेचे तळ्यात मळ्यात

मनसेचे तळ्यात मळ्यात

Subscribe

आगामी विधानसभा निवडणुक लढवायची की नाही याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत दोन पडले आहेत. त्यामुळे येत्या निवडणुकांबाबतचा अंतिम निर्णय शुक्रवारी होऊ शकलेला नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या कृष्णकुंज याठिकाणी शुक्रवारी मनसे पदाधिकारी, नेत्यांची बैठक पार पडली. पण विधान सभेचा अंतिम निर्णय आणि त्याबाबतची घोषणा मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यामार्फत होणार असल्याचे कळते. मनसेने लोकसभा निवडणुकातून माघार घेतली होती.

आगामी विधान सभा निवडणुकीच्या निमित्ताने मनसेत दोन मतप्रवाह पडले आहेत. काही मनसे नेत्यांना वाटत आहे की विधान सभेसाठीची तयारी झाली असल्याने निवडणुकीला सामोरे जावे. तर काही नेत्यांनी ईव्हीएमच्या मॅच फिक्सिंगमुळे निवडणुक लढवू नये असे मत मांडले आहे. ईव्हीएममुळे निकाल जर नकारात्मक येणार असतील तर कशाला निवडणुकीला सामोरे जायचे असा सवाल काहीजणांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे आजच्या बैठकीत विधान सभेबाबत कोणताही अंतिम निर्णय होऊ शकला नाही. विधान सभा लढवायची की नाही याबाबत एकमत न झाल्यानेच आजची बैठक कोणत्याही निर्णयाशिवाय आटोपली. ’लवकरच मनसे प्रमुख राज ठाकरे हे विधान सभेबाबतची अधिकृत घोषणा करतील असे मनसेचे जनरल सेक्रेटरी शिरीष सावंत यांनी आपलं महानगरशी बोलताना सांगितले. सध्या दोन विभिन्न मतप्रवाह असल्यानेच याबाबतचा योग्य निर्णय लवकर जाहीर होईल असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

- Advertisement -

मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत न उतरताही प्रचारात चांगलीच रंगत भरली होती. राज ठाकरेंनी दहा सभा घेऊन मोदी आणि भाजपच्या जाहीरातबाजीचे व्हिडिओ सभांमधून दाखवले होते. ‘लाव रे तो व्हिडिओ’ या राज ठाकरेंच्या तोंडून बाहेर पडणार्‍या शब्दांनी सत्ताधार्‍यांमध्ये दहशत निर्माण केली होती. लोकांनीही राज ठाकरेंच्या या व्हिडिओंना भरभरून प्रतिसाद दिला. मात्र प्रत्यक्षात या सभांचा काहीही परिणाम झाला नाही हे लोकसभा निवडणूक निकालानंतर स्पष्ट झाले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणूक निकालाबाबत ‘अनाकलनीय’ अशी एका शब्दाची प्रतिक्रियाही दिली. आता विधान सभा निवडणूक लढवायची की नाही याबाबत मनसेच्या नेत्यांमध्ये संभ्रम असल्याचे समजते आहे.

ईडी चौकशीनंतर राज ठाकरे गप्प

लोकसभेला राज ठाकरे किती बोलायचे. पण जेव्हापासून त्यांना ईडीच्या चौकशीसाठी बसवून ठेवले तेव्हापासून ते बोलायचे कमी झाले आहेत. ही थट्टा, मस्करी नाहीतर वस्तुस्थिती आहे. लोकशाहीत इतके जुलमी वागुन चालत नाही. यांना सत्तेचा माज आला आहे अशी खरमरीत टीका अजित पवार यांनी या आधी केली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -