घरमुंबईखंडणी प्रकरणी मनसे पदाधिकाऱ्याला अटक

खंडणी प्रकरणी मनसे पदाधिकाऱ्याला अटक

Subscribe

खोट्या आरोपाखाली खंडणी मागणाऱ्या मनसे पदाधिकाऱ्याला खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे.

नवी मुंबईतील कामोठे परिसरात मनसेच्या पदाधिकाऱ्याला पोलिसांनी खंडणी मागितल्या प्रकरणी अटक केली आहे. या पदाधिकाऱ्याने सहा लाख रुपयांची खंडणी मागितली असल्याचा आरोप नोंदवण्यात आला आहे. मिलिंद खाडे असे या पदाधिकाऱ्याचे नाव आहे. कामोठेत राहणारे धर्मा जोशी यांनी घराच्या बांधकामात अडथळा आणणारी काही झाडे तोडली होती. हा प्रकार मिलिंद याला कळताच त्याने सदर ठिकाणी जाऊन फोटो मिळवले. या आधारावर मिलिंद हा जोशी यांना पनवेल महानगरपालिकेद्वारे कठोर कारवाई करून सर्व वर्तमान पत्रात बातम्या छापून आणेल आणि सिडकोचेच निवृत्त अधिकारी कसे नियमांची पायमल्ली करतात म्हणून बदनामी करेल अशी धमकी दिली होती.

सापळा रचून केली अटक

असे न करण्यासाठी या पदाधिकाऱ्याने सहा लाखाची खंडणी मागणी केली होती. मात्र नियमांची पायमल्ली न केल्यामुळे पैसे देणार नसल्याचे सांगितले. त्यांनी याची तक्रार खंडणी विरोधी पथकाला केली. वरिष्ठ पोलीस निरिक्षक शिरिष पवार यांच्या नैतृत्वाखाली पथकाने सापळा रचून या पदाधिकाऱ्याला अटक केली. खंडणीचा अडीच लाखाचा पहिला हफ्ता घेण्यासाठी हा पदाधिकारी आला होता. त्यावेळी त्याला रंगेहाथ अटक करण्यात आली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -