घरमुंबईटोल मुक्तीसाठी मनसेचं मानवी साखळीद्वारे आंदोलन

टोल मुक्तीसाठी मनसेचं मानवी साखळीद्वारे आंदोलन

Subscribe

ठाणेकरांच्या टोल मुक्तीसाठी मनसे पुन्हा एकदा आक्रमक, मानवी साखळी बनवून केले आंदोलन.

ठाण्यातून मुलूंडच्या हद्दीत जाण्यासाठी ठाणेकरांना टोल भरावे लागत आहे जे अन्यायकारक आहे. टोल मुक्तीसाठी मनसे ही पार्टी खूप वेळा पासून प्रयत्न करत आहे. तरी ठाणेकरांसाठी टोल मुक्ती व्हावी म्हणून मनसे पून्हा एकदा आक्रमक झाली आहे. शनिवारी मनसेने आनंदनगर टोल नाका ते कोपरी ब्रीजपर्यंत मानवी साखळी करून आंदोलन केलं. त्यामुळे टोल मुक्तीचा मुद्दा पून्हा एकदा चव्हाटयावर आला आहे. मागील आठवडयात भाजपचे आमदार संजय केळकर यांनी एम एच ०४ या क्रमांकाच्या वाहनांकडून टोल घेण्यात येणार नाही असे जाहिर केले होते. पण अजूनही टोल वसुली सुरूच असल्याने, मनसे ठाणेकरांच्या टोल मुक्तीसाठी रस्त्यावर उतरली होती. मनसेचे नेते अभिजीत पानसरे ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन छेडण्यात आलं होतं. आनंदनगर टोल नाक्यावर प्रचंड वाहतूक केांडी होत असून त्याचाही फटका ठाणेकरांना सहन करावा लागत आहे.

अवघ्या दहा मिनीटांच्या अंतरासाठी अर्धा पाऊण तासाचा खोळंबा सहन ठाणेकरांना सहन करावा लागत आहे. रोजच्या वाहतूक कोंडीमुळे ठाणेकर खूपच त्रस्त झाले आहेत. मनसेच्या साखळी आंदोलनात ठाणेकर नागरिकही सहभागी झाले होते. त्यावेळी ठाणेकरांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. मनसेच्या कार्यकत्यांनी मानवी साखळी करून एमएच ०४ वाहनांना टोल बंद करावा अशा आशेचे फलक कार्यकत्यांनी हातात घेतले होते. टोल मुक्ती न झाल्यास उपोषण छेडण्याचा इशाराही मनसेच्यावतीने देण्यात आला आहे. मनसेच्या आंदोलनामुळे टोल नाका परिसरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -