घरताज्या घडामोडीमनसेचा वर्धापन दिन यंदा नवी मुंबईत

मनसेचा वर्धापन दिन यंदा नवी मुंबईत

Subscribe

यंदा मनसेचा वर्धापन दिन नवी मुंबईत साजरा केला जाणार आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा महाराष्ट्र्र नव निर्माण सेना पक्ष आता १४ व्या वर्षात पदार्पण करणार असून, ९ मार्चला मनसेचा वर्धापन दिन मोठ्या जल्लोषात साजरा केला जाणार आहे. पण यावर्षी वर्धापन दिन जरी दरवर्षी प्रमाणे असला तरी यंदाचा वर्धापन दिन हा नवी मुंबईत साजरा करण्याचा विचार मनसे अध्यक्ष राज ठाकरे करत असून, तशी अंतर्गत चर्चा सध्या मनसेमध्ये सुरू आहे. नवी मुंबई महानगर पालिका डोळ्यासमोर ठेवूनच राज ठाकरे वर्धापन दिन नवी मुंबईमध्ये साजरा करण्याचा विचार करत असल्याची माहिती मिळत आहे.

झेंड्याचा रंग बदलल्या नंतर पहिलाच वर्धापन

दरम्यान, मनसेच्या झेंड्याचा रंग भगवा झाल्यानंतर मनसेचा हा पहिलाच वर्धापन दिन आहे. तसेच यंदा मनसेचा १४ वा वर्धापन दिन असून, हिंदुत्वाचा नवा विचार घेऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे मनसेच्या महाअधिवेशनात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीनंतर जे काही राजकीय नाट्य घडले त्याच्यावर मी सविस्तर बोलेन असे सांगितले होते. त्यामुळे राज ठाकरे मनसेचा वर्धापन दिनी काय राजकीय चिडफाड करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

- Advertisement -

आता मनसेचे कार्यक्रम मुंबई बाहेरही होणार

विशेष बाब म्हणजे, जसे मनसेचे कार्यक्रम हे नेहमी मुंबईमध्ये होत असतात तसेच कार्यक्रम आता महाराष्ट्रातील इतर भागात देखील होणार असल्याची माहिती मिळत आहे. पक्ष वाढीसाठी आणि पक्ष बांधणीसाठी आणि कार्यकर्त्यांना ऊर्जा मिळावी यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हा निर्णय घेतल्याची माहिती मिळत आहे. एवढेच नाही तर मराठी भाषा दिन कार्यक्रम हा ठाण्यात होणार असल्याची माहिती समोर आली आहे.


हेही वाचा – गणेश नाईकांना दे धक्का; भाजपाच्या ४ नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -