घरमुंबईपालिकेतील मनसेच्या कार्यालयाला लागणार टाळे

पालिकेतील मनसेच्या कार्यालयाला लागणार टाळे

Subscribe

मनसेकडे एकच नगरसेवक राहिल्याने पालिकेने मनसेचे पक्ष कार्यालय ताब्यात घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महापालिकेतील गटनेत्यांमध्ये झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महापालिका आयुक्त अजोय मेहता यांची गुरुवारी भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकावरून शिवसेनेवर टीका केली. कुणाच्या स्वार्थासाठी बाळासाहेबांचे नाव वापरले जात आहे. आज महापौर बंगला मागितला जात आहे, उद्या राजभवन मागतील. अशी टीका राज ठाकरे यांनी केली आहे. एकीकडे मनसेने शिवाजी पार्कच्या जिमखान्यावर महापौरांचा बंगला बांधण्यास विरोध करत आहेत. तर दुसरीकडे महानगरपालिकेतील गटनेत्यांमध्ये झालेल्या बैठकीत पालिकेतील मनसेच्या कार्यालयाला टाळे ठोकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


वाचा – आमच्या मोर्चाचा राज ठाकरेंशी संबंध नाही – फेरीवाले

- Advertisement -

असे का घडले?

मुंबई महापालिकेच्या २०१२ मधील सार्वत्रिक निवडणुकीत मनसेचे २८ नगरसेवक निवडून आले होते. त्यामुळे मनसेला पालिकेत प्रशस्त असे कार्यालय मिळाले होते. मात्र, २०१७ च्या निवडणुकीत मनसेचे सात नगरसेवक निवडून आले. त्यापैकी सहा नगरसेवकांनी सत्ताधारी पक्ष असलेल्या शिवसेनेत प्रवेश केला. यामुळे मनसेचा फक्त एकच नगरसेवक पालिकेत शिल्लक राहिला आहे.

पालिकेच्या नियमानुसार कमीतकमी पाच नगरसेवक असलेल्या पक्षाला गटनेते हे पद मिळते. तसेच पालिका त्यांना कार्यालयही उपलब्ध करून देते. मात्र आता मनसेकडे एकच नगरसेवक राहिल्याने पालिकेने मनसेचे पक्ष कार्यालय ताब्यात घेण्यासाठी नोटीस बजावली होती. त्यानंतरही मनसेने पक्ष कार्यालय आपल्या ताब्यात ठेवले आहे. यामुळे हे कार्यालय ताब्यात घ्यावे असा निर्णय गटनेत्यांच्या बैठकीत घेण्यात आला आहे. यामुळे मनसेला आपले हे कार्यालय लवकरच खाली करावे लागणार आहे.

- Advertisement -

वाचा – राज ठाकरेंचा ‘लेझर शो’ वर्षभरापासून बंद


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -