ईडीचा बोर्ड मराठीत हवा यासाठी मनसेची पालिकेला नोटीस

मनसेकडून राज ठाकरे यांना चौकशीला बोलावणाऱ्या अंमलबजावणी संचालन अर्थात ईडीला नोटीस

Mumbai
MNS Chief Raj Thackeray
मनसे अध्यक्ष राज ठाकरे

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना नुकतेच कोहिनूर मिल प्रकरणी चौकशीसाठी बोलावले होते. मात्र आता मनसेकडून राज ठाकरे यांना चौकशीला बोलावणाऱ्या अंमलबजावणी संचालन अर्थात ईडीला नोटीस बजावण्यात आली आहे. ईडीच्या कार्यालायवरील फलक मराठीमध्ये असावा यासाठी आज मनसेच्या कार्यकर्त्यांनी मुंबई महानगर पालिकेच्या ए वोर्ड ला नोटीस दिली आहे. पालिकेला दिलेल्या या पत्रकात ईडीच्या कार्यालयात नाव हे मराठीत असायला हवे अशी मागणी करण्यात आली आहे. या आधी मराठी एकीकरण समितीने ईडीच्या कार्यालयाच्या बोर्ड मराठीत करण्याची मागणी केली होती.


हेही वाचा- ‘Amazon’चे जंगल पेटले; जगाच्या फुफ्फुसांची होतेय राख!

सोशल मीडियावरही ‘ईडी’वर टीका 

दरम्यान सोशल मीडियावर देखील ईडीने आपल्या बोर्डावर मराठीत लिहावं यासाठी मनसेची मोहिम सुरू होती. मात्र अखेर आज एडीचा फलकाबाबत मनसेने पालिकेकडे तक्रार दाखल केली आहे.

असे म्हटले आहे नोटीसमध्ये

मनसेने अंमलबजावणी संचालन कार्यलय बाहेरील असलेल्या फलकावर मराठी भाषेत उल्लेख नसल्याने मुंबई महानगर पालिकेला नोटीस दिली आहे. या नोटीसमध्ये असे म्हटले आहे की, महाराष्ट्र दुकाने आणि अधिनियम १९४८ अंतर्गत कायदे तसेच, महाराष्ट्र दुकाने आणि आस्थापना नियम १९६१च्या नियम २०-ए नुसार प्रत्येक आस्थापनेची पाटी मराठी भाषेत असली पाहिजे. त्यानंतर इंग्रजी आणि इतर भाषेचा उल्लेख असणे बंधनकारक आहे.

यानुसार, अंमलबजावणी संचालन कार्यालय बाहेरील फलकावर मराठी भाषेचा कुठेही उल्लेख नसल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मुंबई महापालिकेला नोटीस देऊन सदर फलक मराठी भाषेत करण्याची सूचना अंमलबजावणी संचालनाला करण्याची विनंती केली आहे.