घरमुंबई'अयोध्येला निघालो जोशात, राजीनामे मात्र खिशात' - मनसेची पोस्टरबाजी

‘अयोध्येला निघालो जोशात, राजीनामे मात्र खिशात’ – मनसेची पोस्टरबाजी

Subscribe

शिवसेनेच्या 'मिशन अयोध्या'वर टीका करण्यासाठी मनसेने खोचक मजकूरासहीत शिवसेना भवनासमोर अनेक फलक लावले आहेत.

शिवसेनेने हाती घेतलेल्या अयोध्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मनसेंने टीकेची झोड उठवली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसैनिक अयोध्या दौऱ्यावर निघाल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेला पुन्हा एकदा डिवचले आहे. ‘अयोध्याला निघालो जोशात, राजीनामा मात्र अजूनही खिशात’ असा खोचक मजकूर लिहिलेले पोस्टर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी शिवाजी पार्क येथील शिवसेना भवनच्या आजूबाजूच्या परिसरात आज लावले. त्यानंतर वाद उद्भवू नये यासाठी पोलिसांनी हस्तक्षेप करत हे पोस्टर तात्काळ काढून टाकले.

- Advertisement -

मनसेची पोस्टर बाजी

शिवसेना आणि मनसेमध्ये वादावादी होणे काही नवीन नाही. त्यातच आता पोस्टरयुद्धाला सुरुवात झालेली पाहायला मिळत आहे. उद्धव ठाकरे निघाल्यानंतर मनसेच्या पोस्टरबाजीला उधान आलेले पाहायला मिळत आहे. ‘अयोध्येला निघालो जोशात, राजीनामा मात्र अजूनही खिशात’ असे फलक शिवाजीपार्कला लावण्यात आले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा वादाला सुरुवात झाली आहे. उद्धव ठाकरे इतिहासात पहिल्यांदाच सहकुटुंब अयोध्येला जात आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत पत्नी रश्मी ठाकरे आणि पुत्र आदित्य ठाकरेही अयोध्याला गेले निघाले आहेत. ठाकरे कुटुंब सकाळी ११ वाजता विशेष विमानाने मुंबई विमानतळावरुन रवाना होणार असून दुपारी २ वाजण्याच्या सुमारास फैजाबाद विमानतळावर उतरणार आहेत.

निवडणुका जवळ येऊ लागल्या आहेत. तसेतसे राम मंदिराचा मुद्दा उचलून धरला जात आहेत. यामध्ये शिवसेना पक्षाने देखील राम मंदिराचा मुद्दा उचलून धरल्याचे दिसून येत आहे. तर भाजपने देखील यामध्ये उडी मारली आहे. तर राम मंदिरावरुन भाजप – शिवसेनेचा पोरखेळ सुरु असल्याची टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. शिवसेनेने अयोध्येत रॅलीचं आयोजन केलं आहे. अयोध्यात रविवारी उद्धव ठाकरे सभेला संबोधित करणार आहेत.

- Advertisement -

संबंधित बातम्या – 

वाचा – शिवसेनेचा अयोध्या दौरा ‘रामदर्शना’साठीच

वाचा – अयोध्या दौरा : हेमंत ढोमेचा उध्दव ठाकरेंना थेट सवाल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -