गांधीनगरात खानाचा शामियाना! धम्माल ट्रोलिंग व्हिडिओ व्हायरल!

उद्धव ठाकरेंच्या गांधीनगर भेटीवर मनसेकडून टीका केली जात असून त्यासंदर्भातला एक ट्रोल करणारा व्हिडिओ देखील आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होऊ लागला आहे.

Mumbai
amit shah
अमित शाह

अमित शाह यांनी शनिवारी गुजरातच्या गांधीनगरमधून उमेदावारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्यासोबत शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरेंनी हजेरी लावून मोठं शक्तीप्रदर्शन केलं. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेचे कार्यकर्ते जरी सुखावले असले, तरी काँग्रेस-एनसीपी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सोशल मीडियावर या भेटीला चांगलंच ट्रोल केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने तर थेट अफजलखान वधावरच्या एका पोवाड्याचंच गाणं थेट अमित शाह-उद्धव ठाकरे यांच्या गांधीनगर भेटीला लावलं आहे. त्यातून त्यांनी केलेल्या धम्माल व्हिडिओला नेटिझन्सची चांगलीच पसंती मिळत आहे.

हेच का शिवरायांचे मावळे??

५ वर्ष अफजलखानाचा कोथळा बाहेर काढण्याची भाषा करणारे, आज थेट त्यांच्याच छावणीत.. हेच का शिवरायांचे मावळे?? यांनी शिवरायांच्या नावानं मतं मागणं म्हणजे महाराजांच्या गौरवशाली इतिहासाचा अपमान आहे.ShivSena Uddhav Thackeray #NCP2019 #LoksabhaElections2019 Amit Shah BJP Maharashtra

Nationalist Congress Party – NCP ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಶನಿವಾರ, ಮಾರ್ಚ್ 30, 2019

राष्ट्रवादी काँग्रेसच्या ऑफिशिअल पेजवर हा व्हिडिओ शेअर झाल्यानंतर मनसेनं देखील तो व्हायरल करायला सुरुवात केली. अमित राज ठाकरे या नावाने असलेल्या एका मनसे फॅन पेजवरून हा व्हिडिओ शेअर झाला आहे. हे अकाऊंट अमितराज ठाकरेंचं ऑफिशिअल अकाऊंट जरी नसलं, तरी मनसेच्याच कार्यकर्त्यांनी हा व्हिडिओ व्हायरल केला असण्याची शक्यता आहे.

🙈😜

मा.अमित राज ठाकरे ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಶನಿವಾರ, ಮಾರ್ಚ್ 30, 2019

या व्हिडिओमध्ये अमित शाह यांना अफजलखान म्हणून दाखवण्यात आलं आहे. तर उद्धव ठाकरेंना सय्यद बंडा म्हणून संबोधलं आहे. व्हिडिओमध्ये अमित शाह आणि उद्धव ठाकरेंच्या भेटीची दृश्य दिसत असतानाच पाठीमागे अफजलखान वधाच्या पोवाड्याचे बोल ऐकू येतात. त्यामुळे हा व्हिडिओ अधिकच गंमतीशीर झाला आहे.


हेही वाचा – काँग्रेसच्या प्रचारासाठी मनसे मैदानात उतरली

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here