घरमुंबईमनसे लावणार ५०० आदिवासी मुला- मुलींचे लग्न

मनसे लावणार ५०० आदिवासी मुला- मुलींचे लग्न

Subscribe

येत्या ९ फेब्रुवारी हा विवाहसोहळा होणार आहे. पालघर जिल्ह्यातील बोईसर येथील खैरपाडा मैदानात सकाळी १०.३० वाजल्यापासून हा सामुदायिक विवाहसोहळा सुरु होणार आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे यांचा विवाहसोहळा नुकताच पार पडला. या विवाहसोहळ्यानंतरही राज ठाकरे यांच्या घरी पुन्हा लगीनघाई सुरु झाली आहे. याच्या मागचे कारण म्हणजे मनसे ५०० आदिवसी मुला- मुलींचे लग्न लावून देणार आहेत. या सामुदायिक विवाहसोहळ्याला स्वत: मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित राहणार आहे. मनसेच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन याबाबत माहिती देण्यात आली आहे.

- Advertisement -

९ फ्रेब्रुवारीला विवाहसोहळा 

मनसेकडून पालघर जिल्ह्यातील गरीब, शेतकरी आणि आदिवासी समाजातील ५०० मुला-मुलींच्या सामुदायिक विवाहसोहळ्याचे आयोजन केले आहे. येत्या ९ फेब्रुवारी हा विवाहसोहळा होणार आहे. पालघर जिल्ह्यातील बोईसर येथील खैरपाडा मैदानात सकाळी १०.३० वाजल्यापासून हा सामुदायिक विवाहसोहळा सुरु होणार आहे. या विवाहसोहळ्याला मनसे अध्यक्ष राज ठकारे आणि त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे हे उपस्थिती लावणार आहे. राज ठाकरे आणि शर्मिला ठाकरे या विवाहसोहळ्या उपस्थिती लावून सर्व जोडप्यांना आशीर्वाद देणार आहेत.


हेही वाचा – राज ठाकरेंचा मुलगा अमित ठाकरेच्या रिसेप्शनला जमले राजकीय पुढारी

- Advertisement -

अमित ठाकरेंचा विवाहसोहळा पार 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे यांचा पुत्र अमित यांचा विवाहसोहळा २७ जानेवारीला पार पडला. फॅशन डिझायनर मिताली बोरूडे हिच्याशी अमित ठाकरे यांचे लग्न झाले. या विवाहसोहळ्याला अनेक दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली होती. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सुनिल तटकरे, पंकजा मुंडे, यांसह बॉलिवूडमधील दिग्गज कलाकारांनी उपस्थिती लावली होती. या ग्रॅण्ड विवाहसोहळ्याची राज्यभर चर्चा रंगली होती.


हेही वाचा – अमित ठाकरेंच्या लग्नात पाहा कोण-कोण आलं!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -