पूरग्रस्तांसाठी मनसेची डोंबिवलीतील दहीहंडी रद्द

२ लाख ५१ हजाराचा निधी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी वापरण्याचा निर्णय मनसेतर्फे घेण्यात आला आहे.

Dombivali
MNS's Dombivali Dahihandi canceled for flood victims
दहिहंडी

राज्यावर अस्मानी संकट ओढवले आहे. कोल्हापूर-सांगली मधील पूर ओसरला असला तरी तेथील जनजीवन अद्याप पूर्वपदावर आलेले नाही. त्यांना मदतीची गरज आहे. शासन पातळीवर आणि विविध सामाजिक संघटना पूरग्रस्तांची मदत करत आहेत. सध्या सणासुदीचे दिवस आहेत. मात्र यंदा राज्यावरील अस्मानी संकटाचे गांभिर्य लक्षात घेऊन यंदा सर्वच सण साधेपणाने साजरा करूया. सणांवरील अनावश्यक खर्च टाळून ती रक्कम पूरग्रस्तांच्या मतदीसाठी वापरूया, असे आवाहन मनसेतर्फे करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे यंदा डोंबिवली शहरात आयोजित करण्यात येणारी दहीहंडी रद्द करून हंडीचा २ लाख ५१ हजाराचा निधी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पाठविण्याचा निर्णय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे घेण्यात आला आहे.

हेही वाचा – पूरग्रस्त भागातील मदतनिसांसाठी ३० हजार अंडी

मंगळागौरीचे कार्यक्रमही रद्द

मनसे डोंबिवली शहरातर्फे कोल्हापूर-सांगली येथील पूरग्रस्तांसाठी मदतीचा पहिला टप्पा रवाना करण्यात आला. पहिल्या टप्प्यात पहिल्या टप्प्यात ६०० लिटर गोडे तेलाचे डबे, साखर ३५० किलो, तूरडाळ २०० किलो, तांदूळ ३२ गोणी, गव्हाचे पीठ ५०० किलो, दूध पावडर २५ पॅकेट, १ हजार २५५ साड्या, यांसह महिलांना पोषाख, ६०० टॉवेल, ६५० शर्ट, ५०० लहान मुलांचे कपडे, १७०० पाणी बाटल्या, फरसाण, २ हजार बिस्कीट पुडे, सॅनिटरी पॅड २०००, मॅगी ४२८ पाकीट, ६०० फिनेल बाटल्या, साबण, खराटे, प्लास्टिक, कापड, प्लास्टिक भांडी ( मग,सूप,ब्रश,झाडू), मसाले, चहा पावडर १६० किलो, ब्लॅंकेट, चादर, चप्पल, चटई, १५० दप्तर-बॅग इत्यादी सामानाची पहिली फेरी मंगळवारी रवाना झाली. मदतीची पुढील फेरी १५ ऑगस्ट रोजी कोल्हापूरकडे रवाना होईल. ”दहीहंडी बरोबरच डोंबिवलीतील महिला सेनेची मंगळागौर रद्द करून पूरग्रस्तांना सढळ हस्ते मदत केली जाणार आहे,” असे डोंबिवली शहर अध्यक्ष राजेश कदम यांनी सांगितले.