घरमुंबईमॉडेल कॉलेजच्या विद्यार्थिनींची मॉडेल कामगिरी; पोलिसांसोबत केली रक्षाबंधन साजरी

मॉडेल कॉलेजच्या विद्यार्थिनींची मॉडेल कामगिरी; पोलिसांसोबत केली रक्षाबंधन साजरी

Subscribe

मॉडेल महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी पोलिसांसोबत रक्षाबंधन साजरी करून कौतुकास्पद कामगिरी केली आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी आपल्या कुटुंबियांना वेळ न देता देशासाठी झटणाऱ्या पोलिसांच्याप्रती कृतज्ञतेच्या भावनेने विद्यार्थ्यांनींनी पोलीस जवानांसोबत रक्षाबंधन साजरी केली.

कोणताही सण असो किंवा ऊन, वारा, पाऊस असो पोलीस जनतेच्या संरक्षणासाठी नेहमी तत्पर असतात. यावर्षी स्वातंत्र्य दिनाच्याच दिवश रक्षाबंधन सण होता. मात्र मुंबई, दिल्लीसह १५ शहरांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आले होते. त्यामुळे संपूर्ण देशात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्यामुळे आपल्या जीवाची पर्वा न करता आपले संरक्षण करणारे पोलीस कर्मचारी आपल्यासाठी ड्यूटीवर तैनात होते. सुरक्षा रक्षकांच्या याच कर्तृत्वाच्या जाणिवेतून कल्याणच्या मॉडेल महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या मार्फत विविध सामाजिक कार्यक्रमांमध्ये भाग घेणार्या विद्यार्थींनी पोलीस जवानांना राखी बांधून त्यांच्यासोबत रक्षाबंधन सण साजरी केला. या विद्यार्थ्यांनींनी कल्याणच्या कोळशेवाडी पोलीस चौकी, चक्की नाका येथील वाहतूक पोलीस चौकी येथे जाऊन पोलीस शिपायांना राखी‌ बांधून अंक्षण केले.

- Advertisement -

‘पोलिसांच्या सदैव ऋणात राहू इच्छितो’

‘आपण या समाजात जन्माला आलो आहोत, तर या समाजाचे काहीतरी देणे लागतो. याशिवाय पोलीस कर्मचारी फक्त रक्षाबंधनच नाही तर गणेशोत्सव, दहीहंडी, नवरात्रौत्सव सारख्या सर्व सणांमध्ये आपल्या सुरक्षेसाठी ड्यूटीवर तैनात असतात. त्यामुळे या शूर जवानांच्या आम्ही सदैव ऋणात राहू इच्छितो’, अशी प्रतिक्रीया मॉडेल महाविलयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकाने दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -