घरमुंबईदेशात पुन्हा मोदींचे सरकार येईल - पियुष गोयल

देशात पुन्हा मोदींचे सरकार येईल – पियुष गोयल

Subscribe

'एका कुटुंबाने फक्त ५० वर्ष भ्रष्टाचार केला पण पारदर्शीपणे लोकांना लाभ पोहोचेल असे काम आम्ही केले आहे', अशी बोचरी टीका पियुष गोयल यांनी केली आहे.

मुंबईमध्ये सध्या रेल्वे मंत्री पियुष गोयल यांची पत्रकार परिषद सुरु आहे. या पत्रकार परिषदेमध्ये गोयल यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले आहे. यावेळी बोलताना गोयल म्हणाले की, ‘भाजपाने ११ आणि १२ तारखेला राष्ट्रीय अधिवेशन दिल्लीत आयोजित केले होते. त्यामध्ये भाजपाचे सर्व मंत्री तसेच देशातील भाजपाचे सर्व नेते असे एकूण १२ हजार लोक एकत्र आले होते. देशात बहुमताने पुन्हा एकदा आमचे सरकार येईल यासाठी आमचे कार्यकर्ते आता कामाला लागले आहेत. २०१३-१४ च्या परिस्थितीला बदलून आज भाजपने भारतात एक वेगळी उंची गाठली आहे. देशाची अर्थव्यवस्था आज सक्षम झालेली आहे. आज देशात प्रत्येकाला वीज मिळत आहे. आज साडेनऊ करोड शौचालय बनले आहेत
६ करोड गरिबांना मोफत कुकिंग गॅस दिले. आज देशात फक्त २ ते अडीच करोड लोकांना फक्त मोफत गॅस देण्याचे शिल्लक राहिले आहे. आयुष्यमान भारतच्या माध्यमातून ५० करोड लोकांना फायदा होत आहे.’

लोकांना मोदींवर आजही विश्वास आहे

गोयल यावेळी म्हणाले की, ‘देशातल्या प्रत्येकाला चांगलं आरोग्य मिळेल. या पाच वर्षात लोकांना भ्रष्टाचार मुक्त सरकार मिळेल. एका कुटुंबाने फक्त ५० वर्ष भ्रष्टाचार केला पण पारदर्शीपणे लोकांना लाभ पोहोचेल असे काम आम्ही केले आहे. गरिबांपर्यत सर्व सोयी प्रत्येक इमानदारीने पोहोचवण्याचे काम आम्ही केले. लोकांना मोदींवर आजही विश्वास आहे. एक मजबूत सरकार आम्ही लोकांना दिले आहे. पुन्हा एकदा जनता मोदींच्या हाती सरकार देईल. जेवढ्या आघाड्या करायच्या तेवढ्या करू दे आम्ही सक्षम आहोत. या देशात अच्छे दिन आलेत आणि अजून येतील.

- Advertisement -

मुंबईमध्ये पाच वर्षात गतीने काम सुरू

मागच्या सरकारने मुंबईचा का विचार केला नाही? माहीत नाही. मात्र, जे ५० वर्षात झाले नाही ते मागील ५ वर्षात झाले. आज मेट्रोचे काम वेगाने सुरू आहे जे आमच्या काळात झाले. पाच वर्षात जी कामं झाली ती याआधी कधी झालेली नाहीत.
बेनामी मालमत्ता जप्त केली जात आहे. त्यामुळे देश सोडून जाणारे आता धास्तावले आहेत. अयोध्येत राम मंदिर बनावे ही प्रत्येकाची इच्छा आहे. काँग्रेस राम मंदिर बनू नये म्हणून अडथळे आणत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -