घरमुंबईभाजपच्या घोषवाक्यातून मोदी गायब

भाजपच्या घोषवाक्यातून मोदी गायब

Subscribe

अब की बार मोदी सरकार…हर हर मोदी घर घर मोदी…2014 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये सर्वच सभांमध्ये आणि भाजपच्या प्रचारामध्ये सर्रास ऐकायला या भाजपच्या घोषणा. ‘अब की बार मोदी सरकार’चा नारा देत 2014 च्या निवडणुकीत मोदींनी काँग्रेससह सर्वच विरोधकांचा सुफडा साफ केला होता. मात्र आगामी लोकसभा निवडणुकीसाठी ‘मेरा भाजपा मेरा परिवार’ अशी घोषणा देत भाजपने मोदींना घोषवाक्यातून गायब केल्याचे दिसून येत आहे.

2014 मध्ये भाजपच्या प्रत्येक घोषवाक्यात दिसणारे मोदींचे नाव आता मात्र गायब होताना दिसत आहेत. 2019 च्या निवडणुकीमध्ये राज्यात प्रचार करण्यासाठी ‘मेरा परिवार भाजपा परिवार’ही नवी टॅग लाईन भाजपने तयार केली असून या माध्यमातूनच भाजप राज्यभर प्रचार करणार आहे. १२ ते ३ मार्च दरम्यान राज्यभरात घरोघरी या टॅगलाईनचे स्टीकर लावण्यात येणार आहे. त्यामुळे 2014 ला मोदींच्या नावाचा जो जलवा होता तो संपल्याचे भाजपनेच मान्य केले की काय, असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे.

- Advertisement -

2014 ची लोकसभा निवडणूक असो वा राज्यातील विधानसभा निवडणूक असो भाजपने मोदी लाटेच्या जोरावर जिंकली होती. मात्र आता देशात आणि राज्यात मोदींची लाट उरलेली नाही. त्यातच मित्रपक्ष शिवसेनेसह विरोधकही मोदींना विरोध करू लागलेत. एकीकडे मोदींची ओसरलेली लाट आणि मित्रपक्षाची नाराजी यामुळे ‘मेरा परिवार भाजपा परिवार’ या नावाने भाजपा प्रचार करणार असल्याचे बोलले जात आहे.मेरा परिवार भाजपा परिवारच्या माध्यमातून भाजप 12 ते 3 मार्च दरम्यान राज्यभर प्रचार करणार असल्याची माहिती मिळत आहे. तसेच या संपूर्ण प्रचारात केंद्र आणि राज्य सरकारची कामे लोकांपर्यत पोहोचवणे आणि नवीन मतदार जोडणे ही भाजपची रणनीती असणार आहे.

तसेच भाजपच्या प्रत्येक सदस्याने घरावर भाजपचा झेंडा आणि स्टिकर लावायचा आहे. एवढेच नाही तर हॅशटॅग #MeraParivarBhajapaParivar या नावाने फेसबुक लाईव्ह आणि ट्वीट करायचं आहे. 12 फेब्रुवारीला मुख्यमंत्री भाजप कार्यालयावर आणि प्रदेशाध्यक्ष औरंगाबाद येथे झेंडा फडकावून या कार्यक्रमाचा शुभारंभ करणार आहेत. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आज मंगळवारी भाजपने सायन येथील षण्मुखानंद सभागृहात शक्तीकेंद्र मेळाव्याचे आयोजन केले आहे. यावेळी जवळपास 3 हजाराहून अधिक कार्यकर्ते आणि बुथप्रमुख उपस्थित राहणार आहेत. विशेष म्हणजे यावेळी या सगळ्यांना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री मुक्तार अब्बास नक्वी हे संबोधित करणार आहेत.

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच भाजपाचे आयकॉन असून त्यांचे नाव वगळण्याचा प्रश्नच येत नाही. मेरा भाजपा, मेरा परिवार हा आमच्या अनेक प्रचारांमधील एक भाग आहे. काँग्रेसचा परिवार हा फक्त गांधी परिवार आहे. भाजपचे तसे नाही
– मधू चव्हाण, भाजप प्रवक्ते.

भाजपलाही आता माहीत झाले आहे की मोदींची लाट ओसरलेली आहे. जनता आता मोदींच्या नावावर मतदान करणार नाही, हे भाजपला कळू लागल्याने आता भाजप या नव्या घोषणेचा वापर करत आहे. – सुनील तटकरे, राष्ट्रवादी नेते

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -