घरमुंबईधक्कादायक! क्वारंटाईन सेंटरमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग; हात पकडून घेतले चुंबन

धक्कादायक! क्वारंटाईन सेंटरमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग; हात पकडून घेतले चुंबन

Subscribe

आणि तिचा हात पकडून 'तू मुझसे प्यार कर' असे बोलून बळजबरीने तिचे चुंबन घेण्याचा प्रयत्न केला

क्वारंटाईन सेंटरमध्ये सॅनिटायझर फवारणी करणाऱ्या कर्मचाऱ्याने १७ वर्षाच्या मुलीचा हात पकडून चुंबन घेतल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास मानखुर्द येथे घडला. या प्रकरणी मानखुर्द पोलिसांनी गुन्हा दाखल करून २० वर्षाच्या कर्मचाऱ्याला अटक केली आहे. या घटनेमुळे क्वारंटाईन सेंटरमध्ये उपचार घेणाऱ्या महिलाच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

वयवर्ष २० असणाऱ्या दिपक सूर्यकांत साळवी असे अटक करण्यात आलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. दीपक हा मानखुर्द पीएमजीपी येथील नवीन म्हाडा वसाहत या ठिकाणी असलेल्या क्वारंटाईन सेंटरमध्ये सॅनिटायझर फवारणीचे काम करतो. या क्वारंटाईन सेंटरमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेत असून त्यांना या ठिकाणी क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवण्यात येते, मात्र त्यात महिला आणि तरुणींचे प्रमाण मोठे आहे.

- Advertisement -

असा घडला प्रकार

सोमवारी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास येथील कर्माचारी दीपक साळवी हा सॅनिटायझर फवारणी करत असताना एका खोलीजवळ गेला त्या खोलीत १७ वर्षांची कोरोना पॉझिटिव्ह मुलगी उपचारार्थ दाखल होती. दीपक हा तिच्या खोलीत घुसला व तिचा हात पकडून ‘तू मुझसे प्यार कर’ असे बोलून बळजबरीने तिचे चुंबन घेण्याचा प्रयत्न केला तसेच तिच्यासोबत अश्लील चाळे करू लागला, या प्रकारामुळे घाबरलेल्या मुलीने आरडाओरड करताच कर्मचारी दीपक साळवी हा तेथून पळून गेला. या मुलीने घडलेला प्रकार तेथील उपस्थित कर्माचारी आणि इतर रुग्णांना सांगितला.

या घटनेची तक्रार मानखुर्द पोलीस ठाण्यात करण्यात आली असता पोलिसांनी कर्मचारी दीपक साळवी याच्याविरुड पोस्को, विनयभंग, तसेच मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपी दिपकला अटक केली असल्याची माहिती मानखुर्द पोलीस ठाण्याचे पोनि. किशोर खरात यांनी दिली.


कंगनाची BMC कडे २ कोटींच्या नुकसान भरपाईची मागणी; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -