घरमुंबईमोनिका मोरेला हात प्रत्यारोपणानंतर सोडले घरी

मोनिका मोरेला हात प्रत्यारोपणानंतर सोडले घरी

Subscribe

मोनिकाच्या प्रकृतीत सुधारणा असल्याने शनिवारी तिला रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. मुंबई आणि पश्चिम भारतातील ही पहिलीच हात प्रत्यारोपण शस्त्रक्रिया आहे.

२०१४ मध्ये रेल्वे अपघातामध्ये हात गमावलेल्या मोनिका मोरेला तब्बल सहा वर्षांनी हात मिळाले आहे. मुंबईतील ग्लोबल हॉस्पिटलमध्ये तिच्यावर ऑगस्टमध्ये हात प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली होती. मोनिकाच्या प्रकृतीत सुधारणा असल्याने शनिवारी तिला रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. मुंबई आणि पश्चिम भारतातील ही पहिलीच हात प्रत्यारोपण शस्त्रक्रिया आहे.

हात मिळत नसल्याने अनेक वर्षांपासून मोनिकाच्या दोन्ही हातांचे प्रत्यारोपण रखडले होते. अखेर ऑगस्टमध्ये हात मिळाल्याने तिच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली. हातांचे प्रत्यारोपणानंतर मोनिकाला अतिदक्षता विभागात स्वतंत्र रूममध्ये ठेवण्यात आले होते. मोनिकाच्या संपूर्ण शस्त्रक्रियेचा खर्च ३६ लाख रुपये एवढा आला आहे. मोनिकाच्या मदतीसाठी अनेक दातेही पुढे आले. दोन्ही हातांना नियमित मलमपट्टी करण्याबरोबरच तिला दिवसांतून दोनदा फिजिओथेरपी दिली जात होती. तसेच हातांच्या हाडांना आधार मिळावा, यासाठी कोपर्‍यापर्यंत प्लास्टर केले होते. शस्त्रक्रियेनंतर अवघ्या तीन दिवसांत ती खांद्याचा आधार घेऊन ती चालू व बसू लागली. तिच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत असून, काही आठवड्यांत तिला कोपरा हलवायला सांगितले जाईल. याशिवाय हात आणि बोटांनी ३ ते ४ महिन्यांनंतर हालचाल सुरू होणे अपेक्षित आहे. तिच्या हाताचे स्नायूतील पेशी आणि हाड तोपर्यत बरे होतील. तिच्या हातांची पूर्णपणे हालचाल होण्यासाठी साधारण एक ते दीड वर्ष लागेल. हात प्रत्यारोपण शस्त्रक्रियेला आता चार आठवडे पूर्ण झाले असून मोनिकाच्या प्रकृतीत सुधारणा झाली असून तिच्या फक्त गोळ्या सुरू आहेत. रूग्ण खुप चांगल्या प्रकारे पूर्ववत होत असून उपचारांना अतिशय चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला आहे. मोनिकाला आता घरी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, घरी गेल्यावरील तिला दररोज व्यायाम व फिजिथेरपी घेणं गरजेचे असल्याची माहिती ग्लोबल रूग्णालयातील कन्सल्टंट प्लॅस्टिक अँड रिकन्स्ट्रक्टिव्ह मायक्रोसर्जन डॉ. नीलेश सातभाई यांनी सांगितले.

- Advertisement -

मोनिकाच्या दोन्ही हातांवर २८ ऑगस्टला तब्बल १६ तास शस्त्रक्रिया करून यशस्वी प्रत्यारोपण करण्यात आले. चार आठवडयानंतर मुंबईतील ग्लोबल रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येत आहे. मोनिकाला घरी काही शारिरीक व्यायाम करायला सांगितले आहेत. त्याबाबत तिच्या आईला ही प्रशिक्षण दिले आहे. आपल्याला हात मिळाल्याचा आणि त्याचे यशस्वी प्रत्यारोपण झाल्याचा मोनिकाला अत्यंत आनंद झाला आहे. तिच्यावर शस्त्रक्रिया आणि उपचार करणार्‍या डॉक्टरांचे तिने आभार व्यक्त केले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -