घरमुंबईमोनो रेल उपनगरीय रेल्वेशी जोडणार

मोनो रेल उपनगरीय रेल्वेशी जोडणार

Subscribe

जगात सर्वाधिक लांबीचा आणि भारतातील पहिला मोनोरेल प्रकल्प हा उपनगरीय लोकलच्या नेटवर्क सोबत जोडणार आहोत. रेल्वे प्रशासनाने याबाबतच्या प्रस्तावाला मान्यता दिल्याचेही जाहीर करत आहोत असे स्पष्टीकरण केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोेेयल यांनी दिले. बहुप्रतीक्षित अशा मोनोरेलच्या वडाळा ते संत दुसर्या टप्प्याचे रविवारी अखेर उद्घाटन झाले. संत गाडगे महाराज चौक (महालक्ष्मी ) येथून पहिल्या मोनो ट्रेन सायंकाळी 6 वाजून १८ मिनिटांनी धावली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज या सेवेचा शुभारंभ केला.

स्कायवॉक, सब वेच्या माध्यमातून अधिकाधिक उपनगरी रेल्वे स्टेशन मोनोरेल सोबत जोडली जातील. त्यामुळे प्रवाशांना नक्कीच फायदा होईल असे मत गोएल यांनी व्यक्त केले. प्रवासाची मोनो मेट्रोसारखी वेगवेगळी माध्यमे उपलब्ध झाली की प्रवासाचे पर्याय नागरिकांना उपलब्ध होतील. त्यामुळे रस्त्यावरील खाजगी वाहने कमी होतील. प्रवासासाठीचा खाजगी वाहनांचा पर्याय कमी वापरला जाईल असाही विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. एमएमआरडीए आयुक्त आर. ए. राजीव यांनी यासाठी पुढाकार घ्यावा असेही ते म्हणाले.

- Advertisement -

आयटीएस प्रकल्प महत्वाच्या टप्प्यात

बेस्ट, मोनो, मेट्रो, रेल्वे आणि रोरो यासारख्या प्रवासाच्या सेवांचे इंटिग्रेशन असणार्‍या इंटिग्रेटेड टिकिटींग सिस्टीमचा प्रकल्प आता महत्वाच्या टप्प्यात आला आहे. या प्रकल्पासाठी रो रो सेवेच्या जलवाहतूकीचा पर्याय आयटीएसशी जोडण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे मुंबईकरांना जलवाहतूक सोयीची ठरू शकते. रो रो प्रकल्पासाठी एक प्रकरण कोर्टात प्रलंबित आहे. त्यानंतर हा प्रकल्प पुढे सरकेल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. आयटीएस प्रकल्पाची निविदा प्रक्रिया महत्वाच्या टप्प्यात आली आहे असे त्यांनी सांगितले.

प्रवाशांसाठी सोमवारपासून सेवा

एकुण 19.54 किलोमीटर लांब अशी ही जगातली तिसरी सर्वात लांब पल्ल्याची अशी मोनोरेल सेवा म्हणून मुंबई मोनोरेलला मान मिळाला आहे. सोमवार पासून सकाळी ६ ते रात्री १० दरम्यान प्रवाशांच्या सेवेसाठी हा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. मोनोरेलच्या ४ ट्रेन्ससह दिवसाला चेंबुर ते जेकब सर्कल दरम्यान प्रत्येक २० मिनिटांच्या अंतराने मोनोरेलच्या १३० फेर्‍या होणार आहेत.

- Advertisement -

आणखी दहा मोनो ट्रेन ताफ्यात

येत्या दोन महिन्यात आणखी दोन मोनोरेलच्या ट्रेन उपलब्ध होणार आहेत. स्पेअर पार्टच्या उपलब्धतेमुळे या आणखी दोन ट्रेन तयार होतील. मोनोरेलच्या आणखी १० नव्या ट्रेन खरेदीसाठी प्रक्रिया आज सुरू करण्यात आली आहे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -