घरमुंबईमोनोरेलचे तिकिट महागणार

मोनोरेलचे तिकिट महागणार

Subscribe

दुसरा टप्पा १ मार्चपासून सुरू होणार

बहुप्रतिक्षित असा वडाळा ते जेकब सर्कल (संत गाडगे महाराज चौक) पर्यंतचा मोनोरेलचा दुसरा टप्पा येत्या १ मार्चपासून सुरू होणार आहे. नवा टप्पा सुरू होताच मोनोरेल तिकिटाचे दरही वाढून किमान १० रूपये होेणार  आहेत. भाडेवाढीच निर्णय आधीच घेण्यात आला आहे. मोनोरेलच्या ताफ्यात आणखी चार ट्रेन दाखल होणार आहे. त्यामुळेच चेंबूर ते जेकब सर्कलदरम्यान मोनोरेलच्या फेर्‍या वाढण्यासाठी मदत होईल.

एमएमआरडीएच्या वतीने चेंबूर ते वडाळा असा पहिल्या टप्पा सध्या ३ ट्रेनचा वापर करून चालविण्यात येत आहे. दुसर्‍या टप्प्यासाठी एमएमआरडीए दुरूस्त केलेल्या ४ ट्रेन सेवेत आणणार आहे. त्यामुळेच मोनोरेलच्या फेर्‍या वाढतानाच प्रवासी क्षमताही वाढणार आहे. सध्या पहिल्या टप्प्याअंतर्गत १५ हजार प्रवासी मोनोरेलचा वापर दररोज करतात. दुसरा टप्पा सुरू झाल्यानंतर १ लाख प्रवासी दररोज प्रवासी करतील असा एमएमआरडीएचा दावा आहे.

- Advertisement -

मोनोरेलचा दुसरा टप्पा सुरू करण्यासाठी आवश्यक असणारे सुटे भाग आज मलेशियावरून मुंबईत दाखल झाले. डायरेक्टर जनरल ऑफ शिपिंग आणि कस्टम विभागाचा हिरवा कंदील मिळाल्यानंतर जेएनपीटी बंदरावरून प्रवास करत हे स्पेअर पार्ट अखेर मुंबईत दाखल झाले आहेत. ३ कोटी रूपयांचे ११२ स्पेअर पार्ट मुंबईत दाखल होतानाच स्पेअर पार्ट वाहून आणणार्‍या कंटेनरला वाहतूक कोंडीचा फटकाही सहन करावा लागला. या स्पेअर पार्टच्या मदतीने फेब्रुवारी महिन्याअखेर मोनोरेलच्या ४ ट्रेन दुसर्‍या टप्प्यासाठी सज्ज होणार आहेत. तर येत्या दिवसांमध्ये आणखी १० मोनोरेल ट्रेन प्रवासासाठी उपलब्ध करून देण्याचा एमएमआरडीएचा मानस आहे. सुरूवातीला ५ ट्रेन खरेदी करण्यात येतील. या ट्रेनसाठी मिळणारा प्रतिसाद पाहूनच आणखी ५ ट्रेन खरेदी करण्यात येतील अशी माहिती मोनोरेल ऑपरेशनचे प्रमुख डी एल एन मुर्थी यांनी दिली.

मोनोचे सध्याचे दर

- Advertisement -

चेंबूर – वडाळा

५ रूपये, ७ रूपये, ९ रूपये, ११ रूपये

१ मार्चपासूनचे दर

चेंबूर ते जेकब सर्कल

१० रूपये, २० रूपये, ३० रूपये, ४० रूपये

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -