घरमुंबईआनंदसरी घेऊन पाऊस नाचत आला ...

आनंदसरी घेऊन पाऊस नाचत आला …

Subscribe

मान्सून विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रासह कोकणात दाखल झाला आहे. सोमवारी विदर्भ, मराठवाड्यात मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे येथील नद्यांना मोठ्या प्रमणात पाणी आले असून विदर्भ, मराठवाडावासिय सुखावले आहेत. तर कोकणात सलग दोन दिवस मुसळधार पाऊस पडतोय. असे जरी असले तरी मुंबई कोरडीच आहे. मुंबईत मंगळवारी पाऊस दाखल होणार असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे.

सोमवारी विदर्भ, मराठवाड्यात मान्सून दाखल झाला. लातूर, अकोला, बुलढाणा, धुळ्यातील काही भागात पावसाने हजेरी लावली. या भागात मुसळधार पाऊस कोसळला. इतका की येथील काही नद्या दुधडी भरून वाहू लागल्या. अनेक ठिकाणी झाडे कोसळल्यामुळे शेतकर्‍यांचे नुकसान झाले. मात्र तरीही पावसामुळे शेतकरी सुखावला आहे. हा पाऊस मान्सूनचाच पाऊस असल्याचे हवामान खात्याने सांगितले.

- Advertisement -

कोकणातही मान्सून दाखल झाला गेली दोन दिवस पाऊस कोकणात कोसळतोय. कणकवली, कुडाळ, सिंधुदुर्ग भागात चांगला पाऊस होत आहे. मात्र रत्नागिरीत पावसाने चांगलाच चकवा दिल्याचे दिसते. गेली दोन दिवस रत्नागिरीत पाऊसाने ओढ घेतली आहे. लवकरच रत्नागिरीतही पाऊस सुरू होईल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

बंगालच्या उपसागराकडून येणार्‍या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी पाऊस पडेल असा इशाराही देण्यात आलाय. मात्र त्यानंतर आठवडाभर पाऊस होणार नसल्याने पावसाचा अंदाज घेऊनच पेरणी करण्याचा सल्लाही हवामानतज्ज्ञांनी दिला आहे.

- Advertisement -

राज्यात सर्वदूर मान्सून दाखल झाला असला तरी मुंबईत मात्र तो आलेला नाही. सोमवारी सकाळी पावसाने मुंबईकरांना चांगलेच फसवले. बोरीवली, कल्याण या भागात पाऊस सकाळी मुसळधार कोसळला. त्यामुळे चाकरमानी छत्री, रेनकोड अशी व्यवस्था करत ऑफिसला निघाले. मात्र ठाणे, मुंबईत येताच पडलेले कडक ऊन चाकरमान्यांना चक्रावून गेले. मुंबईतील काही भागात पाऊस काळोख करून बसरला. तरीही तो मुंबईचा पाऊस नव्हता. मुंबईत उद्यापासून मान्सून दाखल होत असून मंगळवारपासून मुंबईत पाऊस पडायला सुरुवात होईल, असे हवामान खात्याने सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -