घरमुंबईमेट्रो ३ प्रकल्पाचे नऊ टप्पे शिल्लक

मेट्रो ३ प्रकल्पाचे नऊ टप्पे शिल्लक

Subscribe

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (मुं.मे.रे.कॉ) द्वारे मेट्रो-३ मार्गाचे भुयारीकरण पूर्ण करण्यासाठी भुयारीकरणाचे केवळ ९ टप्पे गाठणे बाकी आहेत. उर्वरित भुयारीकरण पॅकेज १,३,४ व ६ या अंतर्गत पूर्ण होणार आहे. आतापर्यंत ३२ टप्पे पूर्ण झाले असून ते पॅकेज २,५,७ अंतर्गत आहेत. एकूण ५४.५ कि मी पैकी ४८ कि मी इतके भुयारीकरण पूर्ण झाले आहे.

मेट्रोच्या भुयारीकरणाच्या कामाअंतर्गत सर्वात पहिला ब्रेक्रथ्रू २४ सप्टेंबर २०१८ रोजी झाला होता. गेल्या दोन वर्षांच्या कालावधीत एकुण ३२ ब्रेकथ्रू या कामाअंतर्गत पुर्ण झाले आहेत. मेट्रो-३ मार्गावर अत्यंत मुंबईतील दाटीवाटीची वस्ती, जुन्या इमारती , ऐतिहासिक वारसा तसेच उत्तुंग इमारती, उड्डाणपुल, मेट्रो मार्ग व रेल्वे मार्गाखालून जात असल्याने येथे भुयारीकरण करणं आव्हानात्मक आहे . मेट्रो-३ सारख्या क्लिष्ट प्रकल्पासाठी एकूण १७ टनेल बोरिंग मशीन एकाच वेळेला कार्यरत असण्याची भारतात कदाचित ही पहिलीच वेळ असेल”, असे एमएमआरसीएलचे संचालक (प्रकल्प) सुबोध गुप्ता म्हणाले,”

- Advertisement -

कोणते ९ टप्पे बाकी ?

भुयारीकरणाचा तपशील खालील प्रमाणे

३३ वा
चर्चगेट ते हुतात्मा चौक

- Advertisement -

३४ वा
सिध्दीविनायक ते दादर
दादर

३५ वा
सहार रोड ते सीएसएमआयए आंतरदेशीय

३६ वा
हुतात्मा चौक ते सीएसएमटी

३७ वा
चर्चगेट ते सीएसएमटी

३८ वा
सायन्स म्युझियम ते महालक्ष्मी

३९ वा
सायन्स म्युझियम ते महालक्ष्मी

४० वा
महालक्ष्मी ते मुंबई सेंट्रल

४१ वा
महालक्ष्मी ते मुंबई सेंट्रल


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -