घरमुंबईएकपेक्षा जास्त पॅन कार्ड वापरल्यास होतं 'हे' नुकसान

एकपेक्षा जास्त पॅन कार्ड वापरल्यास होतं ‘हे’ नुकसान

Subscribe

पॅन अर्थात पर्मनंट अकाऊंट नंबरमध्ये १० डिजीट असतात. पण तुम्हाला माहीत आहे का? एकापेक्षा अधिक पॅन कार्डचा वापर केल्यास नक्की काय नुकसान होतं?

पॅन कार्ड हे आपल्या ओळखपत्रापैकी सर्वात महत्त्वाचं कार्ड असतं. अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक भारतीय व्यक्तीला व्हॅलिड सोर्स ऑफ इन्कमसाठी देण्यात येतं. इन्कम टॅक्स अॅक्ट १९६१ अन्वये पॅन कार्ड मिळवण्यासाठी १८ वर्षानंतर प्रत्येक व्यक्तीला पॅन कार्डासाठी अर्ज करता येतो. पॅन कार्डद्वारे शासनाकडे प्रत्येक व्यक्तीची वित्तीय माहिती राहते. पॅन अर्थात पर्मनंट अकाऊंट नंबरमध्ये १० डिजीट असतात. पण तुम्हाला माहीत आहे का? एकापेक्षा अधिक पॅन कार्डचा वापर केल्यास नक्की काय नुकसान होतं?

कुठे वापरली जातात दोन पॅन कार्ड?

मोठ्या संख्येनं आयकर अर्थात इन्कम टॅक्स भरणारे लोक अथवा कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये काम करणाऱ्यांकडे एकापेक्षा अधिक पॅनकार्ड मिळतात. कधीतरी लक्षात न येता एकापेक्षा जास्त पॅनकार्ड बनवली जातात. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी बदली झाल्यानंतर नवीन पॅन कार्ड तयार केलं जातं पण पहिलं पॅन कार्ड रद्द करायचं राहून जातं. त्यावेळी अशी गफलत होते.

- Advertisement -

अधिक पॅनकार्डनं काय होतं नुकसान?

एकापेक्षा अधिक पॅनकार्ड सापडल्यास, काय नुकसान होतं जाणून घेऊया.

पेनल्टी – कलम २७२ बी अन्वये आयकर अधिनियम १९६१ नुसार दोन पॅनकार्ड ठेवल्यास, तुमच्यावर पेनल्टी (दंड) आकारली जाऊ शकते. हा दंड १० हजार रुपयांपर्यंत असू शकतो. पण आयकर फसवणुकीच्या बाबतीत या आयकरमध्ये घोटाळा केल्यास ही रक्कम जास्त असू शकते.
खटला – दोन पॅनकार्ड ठेवल्यास तुमच्यावर खटला होऊ शकतो. आयकर वाचवला अथवा मनी लॉन्ड्रींग, आयकर फसवणूक यासंदर्भातील हा खटला असू शकतो. इंडियन टॅक्स अॅन्ड मनी लॉन्ड्रींग कायद्यान्वये तुम्ही हा गुन्हा केला असल्यास, अडचणीत येऊ शकता.
लोन अॅप्लीकेशन रद्द – दोन पॅनकार्ड असल्यास, तुम्ही लोनसाठी अर्ज केला असल्यास, तो रद्द होऊ शकतो. बऱ्याचवेळा बँक अथवा अग्रगण्य संस्था दोन पॅन कार्ड असणाऱ्या लोकांना ब्लॅकलिस्टेड करतात आणि आयकर खात्याला त्याची माहिती देतात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -