संतापजनक! कोविड सेंटरमध्ये बाळाला मारण्याची धमकी देऊन आईवर ३ वेळा बलात्कार!

rape
धक्कादायक: COVID Care Centre मध्ये महिलेवर बलात्कार
Advertisement

राज्यात कोरोनाबाधित रूग्णांसाठी कोविड सेंटर उभारण्यात आली आहेत. पण कोविड सेंटरमध्ये सोईसुविधा देण्याच्या नावाखाली एका महिलेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ठाण्यातील कोविड सेंटरमध्ये ही घटना घडली. या प्रकरणी २७ वर्षीय आरोपीला अटक करण्यात आली आहे. या नराधमाने २० वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप केला आहे. पीडित महिलेनं पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केल्यामुळे हा प्रकार उघडकीस आला.

मीरा रोड परिसरातील कोविड सेंटरमध्ये हा प्रकार घडला. पीडीत महिलेला आपल्या १० महिन्याच्या मुलीसोबत एका खोलीत क्वारंटाऊन करण्यात आले होते. याच सेंटरमध्ये तिच्या नात्यातील एका व्यक्तीला भेटायला गेली असता आरोपीने तिच्यावर अत्याचार केला. आरोपी हा पीडित महिलेला गरम पाणी देण्याच्या बहाण्याने खोलीत येत होता. काही दिवसांनी या आरोपीने बाळाला ठार मारण्याची धमकी दिली आणि पीडीतेवर अत्याचार केला.

आपल्या कुटुंबाची बदनामी होईल या भीतीपोटी पीडित महिलेनं तक्रार दाखल केली नव्हती. पण अखेर संतापलेल्या तीने नवघर पोलीस स्टेशनमध्ये येऊन तक्रार दाखल केली. पीडित महिलेच्या तक्रारीनंतर  आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपीवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करत आहे. या आरोपीने जूनच्या पहिल्या आठवड्यात या आरोपीने तीन वेळी पीडितेवर अत्याचार केला होता, अशी माहिती नवघर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संपत पाटील यांनी दिली.


हे ही वाचा – कंगना आणि माझी लढाई सुशांतसाठीच, अध्ययन सुमनचा यू टर्न!