घरमुंबईगाड्या रद्द झाल्याने प्रवाशांची फलाटावर गर्दी कायम

गाड्या रद्द झाल्याने प्रवाशांची फलाटावर गर्दी कायम

Subscribe

संप मागे मात्र फलाटावर गर्दी कायम.

मध्य रेल्वेच्या मोटरमन्सनी ओव्हरटाईम करण्यास नकार दिल्यामुळे शुक्रवारी सकाळ पासूनच मध्य रेल्वेच्या प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला आहे. मात्र, सायंकाळी झालेल्या बैठकीत झालेल्या निर्णयानंतर मोटरमन्सने संप मागे घेण्याचा निर्णय घेतला. तरीही मध्य रेल्वे मार्गावरची गर्दी काही कमी होत नाही. गेल्या अनेक तासांपासून मध्य रेल्वेची वाहतूक उशिराने सुरू आहे. यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले आहेत. मोटारमन आणि रेल्वे प्रशासनाची बातचित सुरू असेपर्यंत रेल्वे काही काळ बंद होत्या. याचा ताण रेल्वे वेळापत्रकावर झाला आहे. त्यामुळे प्रवाशांचा खोळंबा झाला.

मोटरमन्सच्या संपामुळे १०० लोकल फेर्या रद्द

ऐन गर्दीच्या वेळेस मध्य रेल्वेच्या जवळपास १०० हून अधिक फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर, सायंकाळी ५ वाजेपर्यंत ७९ फेऱ्या रद्द कराव्या लागल्या होत्या. दरम्यान, मध्य रेल्वेवर मोटरमनची २९० रिक्त पदे भरून घेण्याप्रमाणेच लाल सिग्नल चुकवणाऱ्या मोटरमन्सला बडतर्फ करण्याचा निर्णय मागे घ्यावा, यासाठी आंदोलन हाती घेण्यात आले. या आंदोलनात सेंट्रल रेल्वे मजदूर संघ, रेल्वे कामगार सेनेसह अन्य संघटनांनीही सक्रिय सहभाग घेतल्याने आंदोलन यशस्वी झाले. शुक्रवारी सकाळी प्रशासन आणि कामगार संघटनांमधील बैठक यशस्वी ठरेल आणि आंदोलन मागे घेतले जाईल, असा दावा पूर्णपणे चुकीचा ठरला. ही गैठक सायंकाळी उशीरापर्यंत सुरु राहिली. त्यामुळे गर्दीच्या वेळी लोकांची गैरसोय झाली.

- Advertisement -

मध्य रेल्वेवर काही कालावधीत चुकीने लाल सिग्नल ओलांडल्यामुळे २४ मोटरमन बडतर्फ करण्यात आले आहेत. हा निर्णय योग्य नसून याआधी असा निर्णय कधीही घेण्यात आला नव्हता असं कामगार संघटना, मोटरमनचे म्हणणं आहे. पदे रिक्त असल्याने जादा तास काम करावं लागत असल्याने शारीरिक, मानसिक ताण वाढत असल्याचे मोटरमन्सचं म्हणणं आहे. या सर्व मागण्यांचा उद्रेक होऊन आंदोलन पुकारण्यात आल्याचं कामगार संघटनांकडून स्पष्ट करण्यात आलं. मोटरमनना सेवेतून बडतर्फ करणे योग्य नसल्याचा पवित्रा संघटनेकडून घेतला गेला आहे. पदे रिक्त असण्यासंदर्भात नियमितपणे भरती प्रक्रिया सुरू असल्याचं मध्य रेल्वेतर्फे स्पष्ट करण्यात आलं आहे. मध्य रेल्वेवर पुढील दोन ते तीन महिन्यात ४८ मोटरमन सेवेत येणार असून अजून काही मोटरमन पुढील वर्षाच्या मध्यापर्यंत सेवेत येतील, अशी माहिती देण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -