घरमुंबईमुंबई पोलीस घोड्यावर

मुंबई पोलीस घोड्यावर

Subscribe

मुंबईत ’माऊंटन कॉप्स’ची सुरुवात, पोलिसांच्या ताफ्यात ३०अश्व

मुंबईतील कायदा सुव्यवस्था तसेच गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मुंबईत ’माऊंटन कॉप्स’ (घोडेस्वार पोलीस) हि पोलिसिंग सुरु करण्यासाठी राज्य शासनाने मान्यता दिली असून लवकरच मुंबई पोलिसांच्या ताफ्यात ३० अश्वांचा समावेश होणार आहे. यासाठी लागणार खर्च शासनाने मंजूर केला आहे. माउंटन कॉप्स हि संकल्पना दिल्ली, बंगळूर, कर्नाटक या ठिकाणी राबवण्यात येत असून यापुढे मुंबईच्या रस्त्यावर सुद्धा घोडेस्वार पोलीस दिसून येणार आहेत.

मुंबईतील कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती हाताळण्यासाठी मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्तांनी ३० अश्वासह मांउटेंड कॅाप्स ( घोडेस्वार पोलीस) या नविन घटकाच्या निर्मितीबाबत प्रस्ताव शासनाकडे सादर कऱण्यात आला होता. शासनाने या प्रस्तावाला मान्यता दिली असून माऊंटन कॉप्स साठी येणार्‍या खर्चास मंजूरी देण्यात आली आहे. लवकरच मुंबई पोलिसांच्या ताफ्यात ३० अश्व येनार आहे. मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी मुंबईच्या रस्त्यांवर घोडेस्वार पोलीस दिसणार आहेत. माउटेंड कॅाप्स ( घोडेस्वार पोलीस ) घटकात १ पोलीस उपनिरिक्षक,१ सहायक पोलीस उपनिरिक्षक, ४ पोलीस हवालदार, व ३२ पोलीस शिपाई असे एकूण ३८ अधिकारी कर्मचारी उपलब्ध होणार आहेत. या साठी एकूण ८२ लाख ४६ हजार आवर्ती तर १ कोटी १६ लाख ८३ हजार अनावर्ती खर्चास मान्यता देण्यात आली आहे. वरील कर्मचारी नायगाव विभागातील आस्थापनेतून मंजूर मनुष्यबळातुन वर्ग करण्यात येणार असून, हे ’घोडेस्वार पोलीस’ पोलीस उपआयुक्त, जलद प्रतिसाद पथक (क्यूआरटी ) यांच्या अधिपत्याखाली कार्यरत असणार आहे.

- Advertisement -

माऊंटन कॉप्स हि संकल्पना नवीन नसून या पूर्वी दिल्ली, बंगळूर, कर्नाटक या ठिकाणी राबवण्यात येत आहे, यापुढे मुंबईत देखील माऊंटन कॉप्स हा घटक सुरु कऱण्यात आला आहे, मुंबईतील कायदा सुवव्यस्था तसेच गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी माऊंटन कॉप्स पोलिसिंग महत्वाची ठरणार आहे. सध्या या अश्वाची काळजी घेण्यासाठी परळच्या बैलघोडा रुग्णालयांची मदत्त घेण्यात येणार आहे. तसेच माऊंटन कॉप्ससाठी इच्छुक पोलिसांची यादी मागवून त्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
मुंबई सहपोलीस आयुक्त संतोष रस्तोगी (प्रशासन)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -