कल्याण काँग्रेसचे पकोडे तळून भाजप सरकारविरोधात आंदोलन

Kalyan
काँग्रेसचे पकोडे तळून आंदोलन

राज्यातील अतिवृष्टी, बँकांची दिवाळखोरी, आर्थिक मंदी, बेरोजगारी, महागाई, शेतकरी आत्महत्या, वाढती गुन्हेगारी, ठप्प झालेले उद्योगधंदे, मंदी, आरोग्य, शिक्षण आदी प्रश्नांवर काँग्रेसकडून देशभरात शुक्रवारी जनआंदोलन करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून कल्याण-डोंबिवली शहर जिल्हा काँग्रेसच्यावतीने कल्याण तहसीलदार कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी वाढत्या बेरोजगारीच्या निषेधार्थ पकोडे तळून केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारच्या निषेधार्थ गाजर वाटप करून उपहासात्मत आंदोलन करण्यात आले.

कल्याण-डोंबिवली शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांच्या नेतृत्वाखाली कल्याण तहसीलदार कार्यालयाच्या बाहेर ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी काँग्रेसच्या कार्यकत्यांनी केंद्र आणि राज्य सरकार दिलेल्या भुलथापांच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. राज्यात अनेक प्रश्नांमुळे सर्वसामान्य जनता त्रासली आहे. तरूणांना नोकऱ्या नाहीत. ज्यांना नोकऱ्या आहेत, त्याही कमी होत आहेत. त्यामुळे वाढत्या बेरोजगारीच्या निषेधार्थ जिल्हाध्यक्ष पोटे यांनी पकोडे तळून भाजप सरकारचा निषेध केला. यावेळी पथनाट्याच्या रूपाने केंद्र आणि राज्य सरकारचा गलथान कारभार जनतेसमोर मांडण्यात आला. यावेळी प्रदेश काँग्रेसचे कोकणचे समन्वयक व ज्येष्ठ नेते संतोष केणे, प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस ब्रिज दत्त, महिला जिल्हाध्यक्ष कांचन कुलकर्णी, ज्येष्ठ नेते रवी पाटील, विमल ठक्कर, मनीष देसले, शकील खान, पोली जेकब, सलीम शेख, राजेश दीक्षित, वैशाली वाघ, राजेश वाघमारे, मुन्ना तिवारी, संतोष पाठक, विशाखा भोईर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here