घरमुंबईवादळाने झोडपले, पण महावितरणने तारले

वादळाने झोडपले, पण महावितरणने तारले

Subscribe

अंधाऱ्या रात्रीतही अखंडीत काम करून ३० हजार ग्राहकांचा वीज पुरवठा सुरळीत

गुरुवारी सायंकाळी झालेल्या वादळी पावसाने महावितरणच्या सफाळे उपविभागात वीज वितरण यंत्रणेचे प्रचंड नुकसान केले. परिणामी सुमारे ३० हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला. विजेचे खांब व वीजवाहक तारा जमीनदोस्त झाल्याने व अनेक ठिकाणी वुक्ष उन्मळून पडल्याने वीजपुरवठा सुरळीत करण्याचे मोठे आव्हान होते. अंधार, घनदाट जंगल, चिखल या सर्व प्रतिकूल परिस्थितीला तोंड देत महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी दुरुस्ती करत या भागाचा वीजपुरवठा रात्रीच सुरळीत केला. या दुरुस्तीच्या कामात ग्रामस्थ आणि कंत्राटदाराच्या कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले.

वादळी पावसामुळे कर्दळ डोंगरी भागात सरतोडी उपकेंद्राला वीज पुरविणाऱ्या ३३ केव्ही लाईनवर एक मोठे झाड उन्मळून पडले. याठिकाणी जेसीबी पोहचण्यात अडचण असल्याने हाताने काम करून तीन ते साडेतीन तासाच्या कालावधीत झाडाचा अडथळा दूर करण्यात आला. यात सरपंच अमोल जाधव व ग्रामस्थांची मोठी मदत झाली. ११ केव्ही सफाळे वाहिनीवर चार ठिकाणी झाडे पडून विजेचे दोन खांब वाकले तर ७ खांब जमीनदोस्त झाले. कपासे ब्रिज येथे वाहिनीवर झाड पडून दोन वीजखांब पडले. रामबाग वाहिनीवर घरतपाडा भागात झाड पडल्याने वीजखांब वाकून वीजवाहक तारा खाली आल्या. तसेच आगरवाडी, एडवन, केळवे वाहिनीवरही अडथळे आले. या सर्व ठिकाणी तात्काळ दुरुस्तीची कामे करून वीजपुरवठा बाधित झालेल्या ग्राहकांना दिलासा देण्याचे काम महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी ग्रामस्थ व कंत्राटदाराच्या मदतीने केले. मुख्य अभियंता दिनेश अग्रवाल, अधीक्षक अभियंता किरण नगांवकर, कार्यकारी अभियंता प्रताप मचिये यांच्या मार्गदर्शनाखाली उपकार्यकारी अभियंता मुकुंद देशमुख व त्यांच्या टीमने ही कामगिरी केली.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -