घरमुंबईमुंबईकरांसाठी Good News! मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यासाठी दाखल होणार १० METRO ट्रेन्स

मुंबईकरांसाठी Good News! मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यासाठी दाखल होणार १० METRO ट्रेन्स

Subscribe

मे २०२१ पर्यंत मेट्रोचा दूसरा टप्पा मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार

मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. MMRDAचे आयुक्त आर ए राजीव यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई मेट्रोचा दुसरा टप्पा मे २०२१ रोजी सुरू होणार आहे. ११ डिसेंबरला पहिली ट्रेन दाखल होणार असून एप्रिल महिन्यापर्यंत पर्यंत १० मेट्रो ट्रेन दाखल होणार असल्याची माहिती MMRDAच्या आयुक्तांनी गुरूवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

मेट्रोचे तिकीट दर कॅबिनेट बैठकीमध्ये ठरल्या प्रमाणेच रहणार असून राजीव पुढे म्हणाले, मे २०२१ पर्यंत मेट्रोचा दूसरा टप्पा मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार आहे. केविड संसर्गामुळे मेट्रोच्या कामाला उशीर होत आहे. तसेच मनुष्यबळ उपलब्ध करताना अडचणी आल्या आहेत. मात्र सगळ्या अडचणींवर मात करून काम करण्यात येत आहे, असेही त्यांनी सांगितले.

- Advertisement -

दरम्यान मेट्रोचा पहिला टप्पा सुरू झाल्यानंतर लोकलचा ताण बराचसा कमी झाला होता. आता दुसरा टप्पा सुरू झाल्यावर हा ताण आणखी कमी होणार असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित प्रवासाची आवश्यकता असल्याने हा दुसरा टप्पा सोयिस्कर ठरणार आहे.

असा असणारे मेट्रोचा मार्ग

  • मे २०२१ ला मेट्रो मार्ग २ ए – दहिसर पश्चिम ते डिएन नगर आणि मार्ग ७ दहिसर पूर्व ते अंधेरी पूर्व सुरू होईल.
  • ११ डिसेंबरला पहिली ट्रेन दाखल होईल आणि मे २०२ १पर्यंत १० ट्रेन्स दाखल होतील.
  • १४ जानेवारी २०२१ ला मेट्रो ट्रायल सुरू होईल.
  • डिसेंबर २०२० पर्यंत हे दोन्ही मार्ग सुरू होणार होते, मात्र कोरोना संकटामुळे पाच महिने विलंब होत असल्याचे सांगितले जात आहे.

‘सत्तेतून फुटणाऱ्या आमदारांना राजकारणातूनच बाद केले जाईल’ – जयंत पाटील

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -