घरमुंबईमुंबई एअरपोर्टचा नवा 'विश्वविक्रम'

मुंबई एअरपोर्टचा नवा ‘विश्वविक्रम’

Subscribe

जगातल्या सर्वात व्यस्त ‘सिंगल रन वे’ एअरपोर्टपैकी एक अशी ‘मुंबई एअरपोर्ट’ची ख्याती आहे. मुंबईच्या आंतरराष्ट्रीय एअरपोर्टवरुन संपूर्ण जगात वाहतूक होत असते. दररोज हजारो प्रवासी मुंबई एअरपोर्टवरुन ये-जा करतात. दररोज सुरळीतपणे चालणारी वाहतूक, प्रवाशांसाठी असलेल्या सर्व आवश्यक सोयी-सुविधा अशा अनेक कारणांमुळे जगभरात प्रसिद्ध असलेल्या मुंबई एअरपोर्टने एक नवा विश्वविक्रम रचला आहे.

काय आहे नवा विश्वविक्रम?

जगातल्या सर्वाधिक व्यस्त एअरपोर्टपैकी एक अशी ओळख असलेल्या मुंबई एअरपोर्टवर दररोज मोठ्या प्रमाणावर विमानांची ये-जा सुरु असते. एका दिवसात एक हजाराहून अधिक विमानांची वाहतूक यशस्वीपणे करण्याचा विश्वविक्रम मुंबई एअरपोर्टने केला आहे. मंगळवारी दिवसभरात तब्बल 1 हजार 3 विमानांची वाहतूक यशस्वीपणे पार पाडत हा विक्रम रचण्यात आला. त्यामुळे मुंबई आंतरराष्ट्रीय एअरपोर्टचं नाव जगभरात पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे.

- Advertisement -

मोडला स्वत:चाच ‘विश्वविक्रम’

विशेष म्हणजे यानिमित्ताने मुंबई विमानतळाने स्वत:चाच जुना विश्वविक्रम मोडल्याची माहिती विमानतळ प्रशासनाच्या प्रवक्त्यांनी दिली आहे. काही महिन्यांपूर्वी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावरुन एका दिवसात एकूण 988 विमानांची सुरळीत वाहतूक व्यवस्था करण्यात आल्याचा ‘विश्वविक्रम’ नोंदवण्यात आला होता. मात्र, मंगळवारी 24 तासांमध्ये एकूण 1 हजार 3 विमानांची वाहतूक प्रक्रिया पूर्ण करत मुंबई एअरपोर्टने स्वत:च रचलेला जुना वर्ल्ड रेकॉर्ड मोडला. ‘मुंबई विमानतळाने आजवर नियंत्रित केलेल्या विमानांच्या वाहतुकीपैकी ही सर्वात मोठी वाहतूक असल्याचं’, विमानतळ प्रशासनाच्या प्रवक्त्यांनी सांगितलं.

- Advertisement -
लंडनचं गॅटविक एअरपोर्टही पडलं मागे…

मुंबई पाठोपाठ जगातील सर्वाधिक व्यस्त सिंगल रनवे एअरपोर्ट म्हणून लंडनच्या ‘गॅटविक एअरपोर्ट’ची ख्याती आहे. गॅटविक एअरपोर्टवरुन तासाला 55 विमानांची वाहतूक प्रक्रिया होते. मात्र, हा विश्वविक्रम रचत ‘गॅटविक’च्या तुलनेत मुंबई एअरपोर्ट सरस ठरलं आहे. याशिवाय मुंबई एअरपोर्टवरील वागहतूक 24 तास सुरु असते, तर गॅटविक एअरपोर्ट मध्यरात्री १२ पासून ते पहाटे 5 पर्यंत बंद असते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -