घरमुंबईकेईम रुग्णालयातील प्रिन्सचा मृत्यू

केईम रुग्णालयातील प्रिन्सचा मृत्यू

Subscribe

परळच्या केईएम हॉस्पिटलमध्ये भाजलेल्या अडीच महिन्यांच्या प्रिन्सचा गुरुवारी मध्यरात्री मृत्यू झाला आहे.

परळच्या केईएम हॉस्पिटलमध्ये भाजलेल्या अडीच महिन्यांच्या प्रिन्सचा गुरुवारी मध्यरात्री मृत्यू झाला. हॉस्पिटल प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रिन्सची काही दिवसांपासून प्रकृती चिंताजनक होती. तो उपचारांना काहीसा प्रतिसाद देत नव्हता. शिवाय, त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. तसेच त्याच्या प्रकृतीबाबतची सर्व माहिती पालकांना देण्यात आली होती. मात्र, गुरुवारी मध्यरात्री प्रिन्सचा मृत्यू झाला आहे. केईएममध्ये दोन आठवड्यांपूर्वी व्हेंटिलेटरच्या वायरमध्ये आग लागल्यामुळे यात भाजलेला प्रिन्स मृत्यूशी झुंज देत होता. तरीही, हॉस्पिटल प्रशासनाकडून प्रिन्सच्या तब्येतीत हळूहळू सुधारणा होत असल्याचे सांगण्यात येत होते. केईएम हॉस्पिटलमधून मिळालेल्या माहितीनुसार, प्रिन्सच्या रिपोर्टमध्ये न्यूमोनिया असल्याचे समोर आले होते. शिवाय, त्याच्या खाण्या-पिण्यावरही मर्यादा आल्या होत्या.

भाजलेल्या बाळाच्या हातावर शस्त्रक्रिया

केईएम हाॅस्पिटलमध्ये काही दिवसांपूर्वी भाजलेल्या प्रिन्स या अडीच महिन्याच्या बाळाच्या हातावर शस्त्रक्रिया केल्यानंतर त्या बाळाचा हात कापण्यात आला होता. केईएम हॉस्पिटलच्या बालरोग विभागात गुरुवारी अचानक शॉर्टसर्किट झालं होतं. या घटनेत केईएममध्ये हृदयावर उपचार घ्यायला आलेला अडीच महिन्यांचा चिमुरडा प्रिन्स गंभीररित्या जखमी झाला होता. दोन आठवड्यापूर्वी मध्यरात्री २.५० वाजण्याच्या सुमारास बेडच्या बाजूला ऑक्सिजन आणि अन्य वायरमध्ये अचानक आग लागली होती. आगीच्या लोटात अडकल्याने बाळाचा एक हात आणि एका बाजूचा चेहरा भाजला होता. त्याच भाजलेल्या हातावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्याच्या भाजलेल्या हाताला संसर्ग झाल्याने डाॅक्टरांनी शस्त्रक्रिया करुन त्याचा हात कापण्याचा निर्णय घेतला.

- Advertisement -

नेमके काय झाले?

उत्तरप्रदेशच्या मऊ जिल्ह्यातील कबिराजपुरमध्ये राहणारे पन्नेलाल राजभर यांना अडीच महिन्यांपूर्वीच एक पुत्रप्राप्ती झाली होती. पण, प्रिन्सची तब्येत सतत खालावलेल्या अवस्थेत होती. त्यानंतर, कुटुंबियांना प्रिन्सच्या छातीत छिद्र असल्याचे कळले. त्यामुळे, कुटुंबिय बाळाला आपल्या भावोजींच्या घरी दाखल झाले. त्यानंतर, उपचारांसाठी ते पालिकेच्या केईएम हॉस्पिटलमध्ये गेले. डॉक्टरांनी तपासणी करत बाळाला अॅडमिट करुन घेतलं होते.


हेहीू वाचा – ज्येष्ठ संपादक नीलकंठ खाडिलकर यांचे निधन

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -