बेस्ट संप दोन दिवस लांबणार

उच्चस्तरीय समितीसोबत झालेल्या बैठकीतून जरी तोडगा निघाला नसला तरी ही बैठक सकारात्मक झाली असल्याचे कामगार नेते शशांक राव यांनी सांगितले.

Mumbai
best employees strike
बेस्ट कर्मचारी संप

बेस्टचा संप आणखी दोन दिवस लांबण्याची शक्यता आहे. आज मंत्रालयात उच्च स्तरीय समितीसोबतच्या बैठकीत बेस्ट कर्मचारी कृती समितीच्या मागण्यांबाबत सविस्तर चर्चा झाली. महापालिका – बेस्ट प्रशासन आणि कर्मचारी संघटना अशा दोन्ही बाजू उच्च स्तरीय समितीने ऐकून घेतल्या. उच्च स्तरीय समितीने कर्मचारी संघटनांकडून लेखी स्वरूपात मागण्या मागवून घेतल्या आहेत. मुख्य सचिव चर्चेचा तपशील मुख्यमंत्र्यांसमोर मांडतील. उच्च स्तरीय समिती अहवाल सोमवारी कोर्टासमोर सादर करणार आहे. कोर्टात मांडलेल्या अहवालावर कोर्ट काय निर्देश देईल यावर बेस्ट संपाचं भवितव्य अवलंबून असणार आहे. त्यामुळे संप आणखी दोन दिवस लांबण्याची शक्यता आहे.

बैठक निष्फळ ठरली

बेस्ट कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या संपाचा आज पाचवा दिवस आहे. सलग ५ दिवस मुंबईकरांचे हाल सुरुच आहे. या संपावर तोडगा निघण्याची आज चिन्ह होती. मात्र मंत्रालयात झालेल्या उच्चस्तरीय बैठकितून तोडगा निघालेला नाही. राज्याचे मुख्य सचिव डी. के. जैन, परिवहन सचिव आशिष कुमार सिंग, नगरविकास सचिव मनीषा म्हैसकर, महापालिका आयुक्त अजोय मेहता, बेस्ट व्यवस्थापक सुरेंद्र कुमार बागडे आणि बेस्ट कामगार कृती समितीचीच्या शिष्टमंडळा सोबत आज बैठक झाली. मात्र या बैठकीतून काहीच तोडगा निघालेला नाही.

संप सुरुच राहणार

दरम्यान, आज उच्चस्तरीय समितीसोबत झालेल्या बैठकीतून जरी तोडगा निघाला नसला तरी ही बैठक सकारात्मक झाली असल्याचे कामगार नेते शशांक राव यांनी सांगितले. बेस्ट समतिचं म्हणणे कमिटीने ऐकून आणि समजून घेतले. अनेक मुद्द्यावर सकारात्मक वाटाघाटी झाली आहे. पुन्हा बैठक होण्याची शक्यता आहे. दरम्यान हा संप सुरुच राहणार आहे मात्र शांततेच्या मार्गाने हा संप सुरुच राहणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे.

हेही वाचा – 

बेस्ट संपाने मोनो, मेट्रो मालामाल

शिवसेनेमुळेच होत आहे बेस्ट कामगारांचे गिरणी कामगार – शशांक राव

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here