घरमुंबईMumbai Bridge Collapse : गंभीर, उदास आणि हुंदकेमय वातावरण

Mumbai Bridge Collapse : गंभीर, उदास आणि हुंदकेमय वातावरण

Subscribe

“अपूर्वा… सोडून गेली” असं म्हणत आपात्कालीन विभागाच्या बाहेर त्यांनी स्ट्रेचरचा आधार घेतला. अपूर्वा प्रभू यांचे पती ओक्साबोक्सी रडत होते. त्यावेळी त्यांच्या पाठीवर थाप देत सांत्वन येथील स्टाफ आणि कर्मचारी होते. घडलेल्या घटनेबाबत अपूर्वा यांच्या पतीला अचानक कळवण्यात आले होते. त्यामुळे आधी धावत येऊन त्यांनी आपात्कालीन विभाग गाठला. पण काही काळाने त्यांना कळलं की आपल्या पत्नीचा मृत्यू झाला आहे आणि त्यांच्या पायाखालची जमीन सरकली.

मुंबईतील सीएसएमटी स्टेशनजवळ असणाऱ्या पादचारी पुलाचा काही भाग गुरुवारी संध्याकाळी कोसळला. संध्याकाळच्या सुमारास हा ब्रीज कोसळल्याची माहिती मिळाली. दररोज हजारो लोकं या ब्रीजवरून ये-जा करत असतात. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला असून यातील तीन महिला जीटी रुग्णालयातील परिचारिका आहेत.

- Advertisement -

हे वाचा – Mumbai Bridge Collaps रात्रपाळीची ड्युटी बेतली जीवावर

तर ४० जण या अपघातात जखमी झाले असून या रुग्णांवर जीटी आणि सेट जॉर्ज रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यात जीटी रुग्णालयात १४ रुग्णांवर उपचार सुरू असून यातील दोन जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती जीटी रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. मुकुंद तायडे यांनी दिली.

- Advertisement -

या अपघाताची माहिती मिळताच अनेक जण आपल्या रुग्णांचा शोध घेत रुग्णालयात दाखल होत झाले आहेत. याठिकाणी रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता डॉक्टरांची टीम तैनात करण्यात आली आहे. तर काम संपवून घरी गेलेल्या परिपारिका पुन्हा कामावर रुजू झाल्या आहेत.

राजकारण्यांनी काढला पळ

गोकुळदास तेजपाल रुग्नालय रात्री उशीरा पर्यंत गर्दीने घेरलेले होते. यात राजकारण्यांनी धाव घेतली होती. महापौर महाडेश्वर ज्यावेळी रुग्णालय परिसरात आले त्यावेळी त्यांना नातेवाईक प्रसारमाध्यमांनी घेरले. मात्र कोणतीही प्रतिक्रिया न देता ते तिथून निघाले. यावेळी विनोद तावडे, राज पुरोहित देखील आले. यांच्या ताफ्यांना आवरताना सुरक्षा रक्षक दिसत होते.

Bhagyshree Bhuwadhttps://www.mymahanagar.com/author/bhagu/
भटकंती करायला खूप आवडतं. कोषात बसून राहणं अजिबात आवडत नाही. वडापाव प्रचंड आवडतो. जेवण तयार करण्याची आवड आहे. भरतनाट्यम शिकतेय. जीवनावर मनापासून प्रेम करते. नकार हा शब्द माझ्या शब्दकोशात नाही.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -