जबाबदारी कोणाची हे निश्चित करा; मुख्यमंत्र्यांचे पालिका आयुक्तांना आदेश

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्टेशन बाहेरील पादचारी पूल कोसळल्याची जबाबदारी कोणाची आहे ते निश्चित करा, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालिका आयुक्तांना दिले आहेत.

Mumbai
cm devendra fadnavis
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्टेशन बाहेरील पादचारी पूल कोसळल्याची घटना गुरुवारी सायंकाळी साडे सातच्या सुमारास घडली. आज सकाळी मुख्यंमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सेंटजॉर्ज रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेतली आहे. त्यानंतर त्यांनी माध्यामांना दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये स्ट्रक्चरल ऑडिट झाल्यानंतर ही पूल कोसळणे हे दुर्दैवीच असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या घटनेची प्राथमिक जबाबदारी निश्चित करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी मुंबई महापालिका आयुक्त अजॉय मेहता यांना दिले आहेत. तसेच आज संध्याकाळपर्यंत त्याचा अहवाल मुख्यंमंत्र्यांकडे सादर करण्यास सांगितले आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत मंत्री गिरीष महाजन देखील उपस्थित होते. तसेच रुग्णालयानंतर त्यांनी घटनास्थळाची पाहाणी केली आहे.

काय म्हणाले मुख्यमंत्री

पूल दुर्घटनेत जखमी झालेल्यांची मुख्यंमंत्र्यांनी विचारपूस केली असून सेंटजॉर्ज रुग्णालयामधील दहा रुग्णांची त्यांनी भेट घेतली असून त्यातील एक रुग्ण आयसीयूमध्ये असून त्याची प्रकृत्ती स्थिर असल्याचे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, स्ट्रक्चरल ऑडिट होईनही अशा घटना घडणे दुर्दैवी असल्याचे त्यांनी म्हटले आहे. स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये हा पूल दुरुस्त असल्याचा शेरा दिला असताना पूल पडतोच कसा? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. या घटनेत दोषी असणाऱ्यांवर कडक कारवाईचे आदेश त्यांनी पोलिसांना दिले आहेत.


वाचा – पेंग्विनपेक्षा मुंबईतल्या माणसांची काळजी करा – नितेश राणे

वाचा – CSMT Bridge Collapse : सिग्नल होता म्हणून…


 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here