घरमुंबईसीएसएमटी पूल दुर्घटनेप्रकरणी याचिका दाखल; २२ मार्चला हायकोर्टात सुनावणी

सीएसएमटी पूल दुर्घटनेप्रकरणी याचिका दाखल; २२ मार्चला हायकोर्टात सुनावणी

Subscribe

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे झालेल्या पूल दुर्घटनेनंतर मुंबई हायकोर्टात याचिका दाखल झाली आहे. या याचिकेवर २२ मार्च रोजी मुंबई हायकोर्टात सुनावणी होणार आहे.

गुरुवारी संध्याकाळी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे मोठी पूल दुर्घटना घडली. या दुर्घटनेत ६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ३६ जण जखमी झाले आहेत. या दुर्घटनेप्रकरणी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल झाली आहे. ही याचिका वकील नितीन सातपुते यांनी दाखल केली आहे. या याचिकेवर २२ मार्च रोजी मुंबई हायकोर्टात सुनावणी होणार आहे. या याचिकेत एलफिन्स्टन पूल दुर्घटनेप्रकरणी दाखल याचिकेत कालच्या दुर्घटनेचा मुद्दा वाढवण्याची मागणी याचिकाकर्त्यांनी केली होती. ही मागणी मान्य करण्यात आली आहे.

काय आहे याचिकेमध्ये?

या याचिकेमध्ये रेल्वे जनरल मॅनेजर, पालिका आयुक्त आणि महापौरांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, याप्रकरणी जबाबदार मध्य रेल्वे आणि पालिका अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना घडल्यानंतर सर्व पक्षाच्या नेत्यांनी घटनास्थळी धाव घेत एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले.

- Advertisement -

सीएसएमटी पूल दुर्घटनेप्रकरणी करण्यात आलेली कारवाई 

– मुख्य अभियंता ए. आर. पाटील, एस. एफ. काकुळते यांचे निलंबन
– निवृत्त मुख्य अभियंता एस. ओ. कोरी आणि निवृत्त उपमुख्य अभियंता आर . बी. तारे यांची खात्याअंतर्गत चौकशी
– कंत्राटदार आरपीएस कंपनीला कारणे दाखवा नोटीस

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -