पुलाचा उर्वरित लोखंडी भाग लवकरच पाडला जाणार

पुलाचा उर्वरित लोखंडी भाग लवकरच पाडला जाणार आहे. त्यासाठी घटनास्थळी असलेल्या लोकांना बाजूला हटवण्यात आले आहे. पुलाच्या दोन्ही बाजूला पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे.

Mumbai
mumbai bridge collapse iron body of bridge demolished soon
पुलाचा उर्वरित लोखंडी भाग लवकरच पाडला जाणार

गुरुवारी संध्याकाळी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जवळ पादचारी पूल कोसळून मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू तर ३४ लोक जखमी झाले आहेत. दरम्यान, या पुलाचे पाडकाम सध्या सुरु असून पुलाचा उर्वरित लोखंडी भाग लवकरच पाडला जाणार आहे. त्यासाठी घटनास्थळी असलेल्या लोकांना बाजूला हटवण्यात आले आहे. पुलाच्या दोन्ही बाजूला पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे. गॅस कटरच्या आधारे हा लोखंडी भाग हटवला जाणार आहे.

हेही वाचा – सीएसएमटी पूल दुर्घटना; मुंबईकर असुरक्षित

दुर्घटना घडल्यानंतर नेत्यांची घटनास्थळी धाव

हा पूल १९८० साली बांधण्यात आला होता. या पुलावरुन दररोज लाखो लोकांची वर्दळ असायची. ही दूर्घटना घडल्यानंतर विविध पक्षाचे नेत्यांनी घटनास्थळी धाव घेतली. ‘या पूलाचं स्ट्रक्चर ऑडीट झालं होतं. त्यात किरकोळ दुरुस्ती करायची असा अहवालात म्हटले होते’, असे खासदार अरविंद सावंत यांनी काल सांगितले. त्याचबरोबर शिक्षण आणि सांस्कृती मंत्री विनोद तावडे यांनीदेखील काल माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत हा पूल १०० टक्के धोकादायक नव्हता, असे म्हटले आहे.

हेही वाचा – CSMT Bridge Collapse : पूल दुर्घटना सीसीटीव्हीत कैद

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here