CSMT Bridge Collapse : सिग्नल होता म्हणून…

सीएसएमटीसमोरच्या रस्त्यावरील सिग्नलमुळे मोठी जीवितहानी टळली आहे.

Mumbai
Mumbai Bridge Collapse
२०१६ या वर्षी पुलाच्या साधारण दुरुस्तीचे आणि रंगरंगोटीचे काम झाले होते

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जवळ पादचारी पूल कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. सीएसएमटी येथील कल्याण दिशेकडील पादचारी पुलाचा स्लॅब कोसळल्याने आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू झाला असला तरी या दुर्घटनेत सीएसएमटीसमोरच्या रस्त्यावरील सिग्नलमुळे मोठी जीवितहानी टळली आहे. ही दुर्घटना घडली त्यावेळी सिग्नल लागल्याने पुलाखालील रस्त्यावर वाहनांची फारशी वर्दळ नव्हती, अशी माहिती समोर आली आहे.

मोठी जीवितहानी टळली

या पुलाकडून जे जे फ्लायओव्हरकडे रस्ता जातो. या रस्त्यावर सायंकाळच्या वेळेत मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. ‘दुर्घटना घडली त्यावेळी या पुलाखालून एक टॅक्सीचालक त्याची गाडी घेऊन जात होता. परंतु सुदैवाने पुलाचा स्लॅब त्याच्या टॅक्सीच्या समोरील भागावर कोसळला आणि टॅक्सीचालक बचावला. या टॅक्सीचालकाने आणि एका प्रत्यक्षदर्शीने वृत्तवाहिन्यांना दिलेल्या माहितीनुसार, हा पुलाचा स्लॅब कोसळला त्यावेळी सीएसएमटीसमोरील मुख्य रस्त्यावर सिग्नल लागला होता. यामुळे पुलाखाली वाहनांची संख्या कमी होती. यामुळेच मोठा अनर्थ टळला. पूल कोसळण्यापूर्वी आवाज आला आणि अवघ्या काही क्षणातच तो पूल कोसळला’, अशी माहिती प्रत्यक्षदर्शीने दिली आहे.

वाहतूक आजही रखडणार?

मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्टेशन बाहेरील पादचारी पूल कोसळल्याची घटना गुरुवारी सायंकाळी साडे सातच्या सुमारास घडली आहे. या दुर्घटनेनंतर आजही वाहतूकीत बदल करण्यात आला आहे. दुर्घटना स्थळाची शुक्रवारी पाहणी करुन दादाभाई नौरोजी मार्गावरील वाहतूक सुरु करण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. या मार्गावरील वाहतूक सुरु होईपर्यंत सीएसएमटीकडे येणारी आणि तेथून उपनगरांकडे जाणारी वाहतूक मेट्रो चौकातून वळविण्यात आली आहे, असे सहआयुक्त (वाहतूक) अमितेश कुमार यांनी सांगितले आहे.


वाचा – Mumbai Bridge Collapse : रेल्वे आणि महापालिकेवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

वाचा – CSMT bridge Collapse: चिमुरडीला मागे सोडून… तपेंद्र गेले


 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here