घरमुंबईमुंबई सेंट्रल टर्मिनसचं नाव लवकरच बदलणार; केंद्र सरकारकडून प्रक्रिया सुरु

मुंबई सेंट्रल टर्मिनसचं नाव लवकरच बदलणार; केंद्र सरकारकडून प्रक्रिया सुरु

Subscribe

शिवसेना खासदार अरविंद सावंत यांची माहिती

मुंबई सेंट्रल टर्मिनसचं नाव लवकरच बदलणार असून याबाबत केंद्र सरकारकडून प्रक्रिया सुरु आहे, अशी माहिती शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी दिली. त्यामुळे आता लवकरच मुंबई सेंट्रल टर्मिनसचं नाव ‘नाना शंकर शेठ’ टर्मिनस होण्याची चिन्ह आहेत. अरविंद सावंत यांनी मुंबई सेंट्रल टर्मिनसचं नामकरण ‘नाना शंकर शेठ’ टर्मिनस करण्याच्या विनंतीसंदर्भात केंद्रीय गृह राज्य मंत्री नित्यानंद राय यांना पत्र लिहिलं होतं. या पत्राचं उत्तर देताना नित्यानंद राय यांनी प्रक्रिया सुरु असल्याची माहिती दिली. दरम्यान, ठाकरे सरकारने मुंबई सेंट्रल टर्मिनसचे ‘नाना शंकरशेठ टर्मिनस’ स्टेशन असे नामकरण करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे आता केंद्र सरकारने शिक्कामोर्तब केल्यानंतर हे नाव प्रत्यक्षात येईल.

मुंबई सेंट्रल टर्मिनसला नाना शंकरशेट यांचं नाव देण्याची मागणी फार जुनी आहे. त्याला आधीच फार विलंब झाला आहे. याबाबत राज्य सरकारने विधिमंडळात प्रस्ताव मंजूर केल्यानंतर केंद्र सरकारकडून विलंब होण्याचं कोणतंही कारण नाही, असं अरविंद सावंत यांनी म्हटलं आहे. यासंदर्भात सावंत यांनी केंद्रीय गृह राज्य मंत्री नित्यानंद राय यांना पत्र लिहिलं होतं. पत्राला नित्यानंद राय यांनी उत्तर दिलं असून नामांतराला सकारात्मक उत्तर आल्याचं अरविंद सावंत म्हणाले. केंद्र सरकार कडून याबाबत प्रक्रिया सुरु असल्याची माहिती केंद्रीय गृह राज्य मंत्र्यांनी दिल्याने लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्ण होईल व नाना शंकरशेट यांचे नाव मुंबई सेंट्रल टर्मिनसला मिळेल, अशी आशा अरविंद सावंत यांनी व्यक्त केली.

- Advertisement -

आतापर्यंत ‘एल्फिन्स्टन रोड’चं प्रभादेवी, व्हीटी (व्हिक्टोरिया टर्मिनस)चं ‘सीएसटी’ (१९९५ ते १९९९ दरम्यान शिवसेना-भाजप युतीकाळात) आणि नंतर ‘सीएसएमटी’ अर्थात ‘छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस’ असं नामकरण करण्यात आलं आहे. त्याच पाठोपाठ आता मुंबई सेंट्रल टर्मिनसचं नामांतर होणार असून नाना शंकर शेठ असं ठेवलं जाणार आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -