शिवसेनेला पाठींबा देण्यासाठी डबेवालेही अयोध्येला जाणार

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी मुंबईचे डबेवाले अयोध्येला जाणार असल्याची माहिती प्रवक्ते सुभाष तळेकर यांनी दिली.

Mumbai
dabbewala in mumbai
मुंबईचा डबेवाला (प्रातिनिधिक चित्र)

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी मुंबईचे डबेवाले अयोध्येला जाणार असल्याची माहिती प्रवक्ते सुभाष तळेकर यांनी दिली. या संदर्भात मुंबई डबेवाला असोसिएशनने एक पत्रक जारी केले आहे. डबेवाल्यांच्या अयोध्या दौऱ्यामुळे त्यांच्या सेवेत कुठलाही खंड पडणार नाही, अशी ग्वाहीही तळेकर यांनी दिली. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे अयोध्येला जाणार आहे. यावेळी मुंबईतून शिवसैनिक मोठ्या प्रमाणात अयोध्येला जाणार असून त्यांच्यासाठी विशेष रेल्वेची सोय केली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. याच रेल्वेने डबेवाले अयोद्धेला रवाना होतील, असेही तळेकर यांनी सांगितले.

वाचा : शिवसेना दसरा मेळावा : २५ नोव्हेंबरला अयोध्येला जाणार, उद्धव ठाकरेंची घोषणा!

डबेवाल्यांना नेहमीच शिवसेनेने पाठिंबा दिला

दसरा मेळाव्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आपण अयोध्येला जाणार असल्याचे जाहीर केले होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघही आता राम मंदिर मुद्द्यावरुन आक्रमक झाला आहे . या मुद्यावर हिंदुत्ववादी संघटनांसह काँग्रेसनेही आमच्या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे. तसेच डबेवाल्यांच्या संकटाच्या काळात ठाकरे कुटुंब आणि शिवसेना नेहमी त्यांच्या मागे उभी राहत आली आहे. हीच जाणीव ठेवून सेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मागे खंबीरपणे उभे राहण्याचे मुंबई डबेवाला असोसिएशन ठरवले आहे, असेही सुभाष तळेकर यांनी सांगितले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here