घरमुंबईडबेवाल्यांना मेट्रोतून जाण्याची परवानगी मिळावी यासाठी मुख्यमंत्र्यांची घेणार भेट

डबेवाल्यांना मेट्रोतून जाण्याची परवानगी मिळावी यासाठी मुख्यमंत्र्यांची घेणार भेट

Subscribe

मुंबईत सुरक्षित आणि वेगवान प्रवास होण्यासाठी तसेच लोकलवरील ताण कमी करण्यासाठी मेट्रो, मोनो रेल्वे यांची आवश्यक्ता आहे. याबाबत डबेवाला असोसिएशन लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर करणार आहेत.

मुंबई दिवसेंदिवस वेगवान होत चालली आहे. वेस्टर्न, सेन्ट्रल, हार्बर लोकलवरील गर्दिचा ताण कमी व्हावा, म्हणून मुंबईत मोनो आणि मेट्रो यांचे जाळे विणले जात आहे. चेंबुर ते सातरस्ता मोनो रेल्वे चालू आहे. घाटकोपर-वर्सोवा मेट्रो रेल्वे चालू आहे. मुंबईत अनेक ठिकाणी मेट्रो रेल्वेची कामे चालू आहेत. मुंबईत सुरक्षित आणि वेगवान प्रवास होण्यासाठी तसेच लोकलवरील ताण कमी करण्यासाठी मेट्रो, मोनो रेल्वे यांची आवश्यक्ता आहे. याबाबत डबेवाला असोसिएशन लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर करणार आहेत, अशी माहिती मुंबई डबेवाला असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी दिली आहे.

काय म्हणाले सुभाष तळेकर

मेट्रो आणि मोनो रेल्वे मुंबईत आणली खरी पण ती आणताना विदेशाच्या धर्तीवर तिचा अभ्यास केला गेला. त्यानुसार ती मुंबईत आणली. मुंबई खऱ्या अर्थाने कामगारांची, कष्टकऱ्यांची व लहानसहान व्यापार उद्योग करणाऱ्यांचीही आहे. हा वर्ग मुंबईत काम करत असताना अथवा प्रवास करत असताना त्यांच्याकडे थोडेफार तरी सामान असतेच. ठराविक वजन तसेच लांबीचेच सामान मेट्रोमधून नेता येते. त्यामुळे या वर्गाला सामान घेऊन मोनो, मेट्रोमधून प्रवास करता येत नाही. आमचा साहेब मोनो अथवा मेट्रोने ऑफीसला जावू शकतो. पण त्या साहेबांचा डबा ऑफीसला मात्र आम्ही मोनो, मॅट्रोने नेऊ शकत नाही, अशी आजची स्थिती आहे, असे मत अध्यक्षांनी मांडले आहे.

- Advertisement -

याबाबत लवकरच मुंबई डबेवाला असोशिएशन यांचे वतीने एमएमआरडीचे अध्यक्ष आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना याबाबत निवेदन देण्यात येणार आहे. यामध्ये मोनो आणी मेट्रोमधून कामगारांना, कष्टकऱ्यांना थोडेफार सामान घेऊन जाण्यास परवानगी द्यावी तसेच मोनो, मेट्रोला लहानसा लगेज डबा द्यावा असे नमूद करण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -