घरमुंबईमुंबईचे डबेवाले आज रजेवर

मुंबईचे डबेवाले आज रजेवर

Subscribe

मुंबईकरांना वेळेवर डबा पोहोचवणारे डबेवाले आज सुट्टीवर जाणार आहेत.

मुंबईकरांचे पोट भागवण्यासाठी मुंबईकरांना वेळेवर डबा पोहोचवणारे डबेवाले आज सुट्टीवर जाणार आहेत. त्यामुळे डब्बे घेणाऱ्या मुंबईकरांना आधीच आपली सोय करावी लागणार आहे. बुधवारी झालेल्या पावसामुळे डबेवाल्यांनी आपली सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

…यामुळे घेतला निर्णय

बाप्पाच्या आगमनासोबत पावसाने जोरदार पुनरागमन केलं आहे. सलग तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने मुंबईसह अनेक भागाला झोडपून काढलं आहे. या मुसळधार पावसाने बुधवारी मुंबईमध्ये सामान्याचे जनजीवन झाले होते. तसेच ८ सप्टेंबरपर्यंत मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामानखात्याने व्यक्त केला आहे. म्हणून गुरुवारी डबेवाल्यांनी आपली सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे जाहीर केले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – मुसळधार पावसाने लांब पल्ल्याच्या गाड्यांचं वेळापत्रक बदललं!

शाळा-कॉलेजनाही सुट्टी

या संततधार पावसामुळे मुंबईकरांची लाईफलाईन विस्कळीत झाली होती. मात्र, रात्री पासून पावसाने विश्रांती घेतल्याने मुंबईकरांची लाईफलाईन पूर्वपदावर येत आहे. बुधवारच्या या मुसळधार पावसामुळे गणेश भक्तांची देखील तारांबळ उडाली होती. तसेच मुंबईतील अनेक सखल भागात पाणी साचले होते. या मुसळधार पावसामुळे गुरुवारी मुंबई, ठाणे आणि कोकण भागातील सर्व शाळा-कॉलेजना सुट्टी देखील जाहीर करण्यात आली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – गणेशोत्सव मंडळांना पावसाचा फटका

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -